Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳ खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून पथकांची स्थापना  






परभणी ➡️ जिल्ह्यात खरीप- 2022 या हंगामामध्ये 566294 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन 251500 हेक्टर, कापूस 195300 हेक्टर व तूर 44350 इत्यादी प्रमुख पिकांचा सामावेश आहे. तरी शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दर्जेदार, रास्त भाव व योग्य वेळी योग्य किंमतीत मागणी प्रमाणे खते, बियाणे व किटकनाशके मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर 9 भरारी पथके असे एकुण 10 पथकाची स्थापना करण्यात आली आहे.




जिल्हास्तरावर एका व प्रत्येक तालुक्यात एक असे एकुण 10 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही.




तरी काही अडचण आल्यास शेख एम. एम. जिल्हा कृषी अधिकारी (सा), जि.प. परभणी (मो. ९9423542515) व पी.एन. शिंदे, जि.प.परभणी (मो.9423481104) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 




सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत वरील क्रमांकावर संपर्क करता येईल व तालुका स्तरावर संबंधित कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तांत्रिक शाखेचा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 




तसेच काही तक्रार असल्यास adozpparbhani@gmail.com .  dsaopbn@gmail.com वर सुद्धा ई-मेलद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही.डी.लोखंडे यांनी दिली.






Post a Comment

0 Comments