Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳ आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा नागरिकांसाठी परिसंवाद कार्यक्रम 





१. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अधिकाऱ्यांची घेतली पूर्वनियोजन बैठक

२. विविध योजनेतील लाभार्थी परिसंवाद कार्यक्रमात होणार सहभागी  

३. जिल्ह्यातील नागरिकांना देखील कार्यक्रम ऑनलाईन प्रणालीवर बघता येणार 

परभणी ➡️ भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधनू केंद्र शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमतृ महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधारित मंगळवार  दि. ३१ मे २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन प्रणालीद्वारे विविध योजनांविषयी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.





या परिसंवाद कार्यक्रमाला अनुसरून परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सोमवार दि. ३० मे २०२२ रोजी संबंधित विविध विभागातील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. परिसंवाद कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या लाभार्थ्यांची योग्य ती व्यवस्था करण्यापासून कार्यक्रम यशस्वी करण्या पर्यंत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. 






जिल्हातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, दि. ३१ मे २०२२ रोजी मा. पंतप्रधान महोदय आणि मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या परिसंवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://pmevents.ncog.gov.in/registration/index/101/?utm_source=04 या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. तसेच समाजमाध्यमाद्वारे, ऑनलाईन लिंक द्वारे परिसंवाद कार्यक्रमात सहभागी व्हावे.

शिवानंद टाकसाळे 
मुख्य कार्यकारी अधिकारी 
जिल्हा परिषद, परभणी.





दि. ३१ मे २०२२ रोजी ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सभागृहात करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनेतील लाभ घेतलेले प्रत्येकी ३० लाभार्थी या परिसंवाद कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविणार आहेत. तर जिल्ह्यातील इतर नागरिकांसाठी दूरदर्शन आणि इतर इलेकट्रॉनिक माध्यमातून प्रसारण करण्यात येणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या जिल्हास्तरीय परिसंवाद कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर आणि त्यांची टीम करत आहे.  




सदर कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिकांची कुटुंब,  खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी १०.५५ ते १२.१० या वेळेत शिमला, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमातून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृह येथील कॅबिनेट हॉल मधून सकाळी ९.४५ ते १०.४५ या वेळेत उपस्थितांना संबोधित करतील.   







Post a Comment

0 Comments