Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳ पंतप्रधान बाल सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण





⭐ पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत कार्यक्रम. 

⭐ जिल्ह्यातील पाच बालकांना आर्थिक सहाय्य.  

वर्धा ➡️ कोरोना काळात दोनही पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान बाल सुरक्षा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना  विविध प्रकारचे लाभ देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.





वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांचे हस्ते वर्धा जिल्हयातील दोनही पालक गमावलेल्या पाच बालकांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच मुलांच्या वयानुसार 10 लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा कार्ड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. एका बालकाला केंद्रिय विद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांची उपस्थिती होती.





कोरोनामुळे दोन्ही पालक, कायदेशिर पालक व दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांची काळजी व संरक्षण सुनिश्चित करणे, आरोग्य शिक्षणाव्दारे सक्षमीकरण करणे, वयाच्या 18 व्या वर्षी मासिक वेतन आणि वयाच्या 23 व्या वर्षी एकरकमी 10 लाख रुपयाचा लाभ देऊन बालकांना स्वयंपुर्ण  करण्यासाठी सदर योजना महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. यासाठी वर्धा जिल्ह्यात पाच बालकांची नोंद करण्यात आली असून या पाचही बालकांना या योजनेचा  लाभ देण्यात येत आहे. 





कोरोनामुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड' निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.





तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावपूर्ण निवेदनात बालकांना तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला. त्यांनाच मोठे होता आले. त्यामुळे हार न मानता लढण्याचे आवाहन केले. केंद्रीय महिला व बाल  कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सेवा हेच कर्म माणणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे सांगितले. 




                                             




Post a Comment

0 Comments