Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी




परभणी ➡️ आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी हिंगोली व परभणी जिल्हयातील शासकीय , जिल्हा परिषद शाळा , अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाद्वारे संचलित शासकीय एकलव्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासनाने प्रवेश पात्रता परिक्षा आयोजित केलेली आहे. 





तरी ज्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाकडुन प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावा व सदर अर्ज भरून मुख्याध्यापक यांचेकडेच भरुन द्यावा. पालकाचे वार्षीक उत्पन्न 06 लाखापेक्षा जास्त नसावे, सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित, आदिम जमातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे या प्रवेशासाठी अशा अटी व शर्ती आहेत.

 




सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहीत करावे. प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली येथून प्राप्त करून घ्यावे. 




तसेच शासकीय आश्रमशाळा जामगव्हाण, गोटेवाडी, बोथी, पिंपळदरी, शिरडशहापुर येथील मुख्याध्यापक यांचेकडेही उपलब्ध आहेत. सदर प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि . हिंगोली येथे सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments