Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शैक्षणिक उन्नतीसाठी नॅक मूल्यांकन गरजेचे - प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव




परभणी  ➡️ परभणी होऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणात वरिष्ठ महाविद्यालयासाठी नॅक मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. अध्ययन-अध्यापनात सुधार करत पूरक भौतिक संसाधने विद्यार्थ्यांना देत शैक्षणिक विकास शक्य आहे. त्यासाठी  महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी सोमवार  (दि.25) रोजी व्यक्त केले.

 

बुलढाणा येथील विदर्भ महाविद्यालयाच्या मूल्यांकनाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पांडुरंग हुडेकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.संगीता पवार, डॉ.वैभव वाघमारे आदींची उपस्थिती होती.



केंद्र शासनाच्या 'परामर्श' या योजनेअंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयाने पाच महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकनाच्या संदर्भाने पालकत्व स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 



मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.जाधव पुढे म्हणाले, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी या चतुसूत्रीने नॅक मूल्यांकन करणे सहज आणि सोपे आहे. ज्याचा फायदा महाविद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी हमखास होतो असेही मत त्यांनी नोंदवले. यावेळी प्राचार्य डॉ.पांडुरंग हुडेकर म्हणाले, नॅक मूल्यांकनाच्या संदर्भाने श्री शिवाजी महाविद्यालय आदर्श असे उदाहरण आहे.





 या महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वीरित्या नॅकचे पहिले मूल्यांकन करू हा आत्मविश्वास आम्हाला प्रस्तुत महाविद्यालयातून मिळाला आहे. या कार्यशाळेसाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाचे सर्व सदस्यांसह बुलढाण्याच्या विदर्भ महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.रोहिदास नितोंडे यांनी, सूत्रसंचालन आणि आभार प्रा.डॉ.जयंत बोबडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.सय्यद सबिहा, डॉ.प्रवीण जगताप, डॉ. सुरेंद्र येनोरकर, डॉ.सचिन येवले, डॉ.रामदास टेकाळे, डॉ.गणेश चालींदरवार, डॉ.विजय कळमसे, डॉ.उत्कर्ष किट्टेकर, प्रा.शरद कदम, सय्यद सादिक, साहेब येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.


फोटो कॅपशन: परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने नॅक मूल्यांकन विषयावर आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, समवेत प्राचार्य डॉ.पांडुरंग हुडेकर, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.जयंत बोबडे तसेच सहभागी प्राध्यापक दिसत आहेत.







Post a Comment

0 Comments