Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या पालम तालुकाध्यक्षपदी अक्षयकुमार गडगिळे यांची निवड 





पालम
➡️ अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या पालम तालुकाध्यपदी अक्षयकुमार गडगिळे यांची निवड करण्यात आली. समता परिषदेच्या वतीने परभणी येथे आयोजित आढावा बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, प्रदेश सचिव रविभाऊ सोनवणे, प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष वीरकर यांच्या हस्ते गडगिळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.



बहुजनांचे संघटन व समतेचा विचार घराघरात घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न कराल, हा आशावाद यावेळी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. समता परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.



अक्षयकुमार गडगिळे यांच्या निवडीचे अनेक मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. पालम तालुक्यातील अक्षयकुमार गडगिळे मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समता परिषदेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments