Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पोरवड ग्रामस्थांच्या वतीने सैनिक पार्वती तिडकेचा भव्य सत्कार सोहळा संपन्न





परभणी
➡️ तालुक्यातील पोरवड येथील पार्वती तातेराव तिडके हिने भारतीय सशस्त्र दलातील प्रशिक्षण पूर्ण करुण आपल्या मूळ गावी परत आल्यानंतर श्री नृसिंहाचे दर्शन घेऊन तिची पोखर्णी ते पोरवड  देशभक्तीपर गीताने मोटार सायकल रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने डॉ. गंगाधर तिडके व त्यांचे सहकारी यांच्या नियोजनातुन गुरुवार (दि.28) एप्रिल रोजी सैनिक पार्वतीचा तिची आई शोभा व वडील तातेराव समवेत भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला.




यावेळी बोलताना सुरेश भूमरे म्हणाले की मुला-मुलींच्या जीवनातील 10 वी नंतरचे पाच वर्ष महत्वाचे आहेत. महिला हया पुरुषा इतक्याच सक्षम असून आज पार्वतीने समाजासमोर आदर्श ठेवला असे सांगितले. सूत्रसंचालन शिवराम तिडके व अविनाश सूर्यवंशी यांनी तर आभार ईश्वर गिराम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोरवड ग्रामस्थ,शालेय समिति,शिक्षक,युवक,पंचक्रोशितील नागरिकांनी परिश्रम घेतले.

 



देश सेवेसाठी मुला-मुलींनी पुढाकार घ्यावा- सैनिक पार्वती

ग्रामीण भागातील तरुण मुला-मुलींनी उच्च शिक्षित होऊन  देशसेवा करण्यासाठी प्रत्येक गावातुन पुढाकार घेत पुढे आले पाहिजे. व्यसनमुक्त तरुण हिच देशाची संपत्ति आहे. युवक-युवतीनी आदर्श आणि निर्व्यसनी गांव निर्मितिसाठी प्रयत्न करावे असे सैनिक पार्वती तिडके हिने सांगितले.




यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सविता गंगाधर तिडके,तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ति भारतीय सैनिक पार्वती तिडके, भाजपा युवा मोर्चा ज़िल्हाध्यक्ष सुरेश भूमरे, पोलिस उपनिरीक्षक मुंढे,सेवा निवृत्त पोउनि गंगाधर  लेंगुळे,रोहिदास महाराज मस्के, उपसरपंच प्रल्हाद गिराम,पो.पा.मुंजाजी सूर्यवंशी, विधिज्ञ कुलकर्णी,प्रसाद  लेंगुळे,तलाठी श्रीमति गूंजकर,ग्रामपंचायत सदस्य पोरवड,ग्रामसेवक काकडे,सरपंच नाना खोंड,तातेराव तिडके,शोभा तिडके,अशोक गिरी,डॉ.गंगाधर तिडके,डॉ. विठ्ठल तिडके,बंडू तिडके,जयराम गिराम,सटवाजी जगताप,अशोक तिडके आदिंची उपस्थिती होती.







Post a Comment

0 Comments