Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सात वर्षीय आलीना नज़ीर कुरैशी या चिमुकलीने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा






जिंतूर ➡️ शहरातील ऊसमान पुरा परिसरात राहणारी अवघ्या 07 वर्षाची छोटीशी चिमुकली कु.आलीना नज़ीर कुरैशी यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा दि. 25 एप्रिल सोमवार रोजी ठेवला असून चिमुकली आलीना कुरैशी हिचे सर्वस्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे.




मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान हा महिना असून  आलीना कुरैशी यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आजवरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेला एप्रिल महिन्यात आलेला हा रमजानचा महिना आहे.




या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी देखील न पिता हा रोजा (उपवास) ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांना देखील खूप त्रास होतो त्यात या सात वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला.




त्यामुळे या छोट्याश्या आलीना  कुरैशी त्याचे वडील नजिर कुरैशी,भाऊ आदील कुरैशी, काका नईम कुरैशी आदी परिवारातील वकुरैशी बिरादार लोकांनी कौतुक व अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments