Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

'परभणी मेडीकल कॉलेज' साठी पदे आणि बांधकामासाठी सरकारकडून निधी बहाल




परभणी ➡️ 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नीत 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापनेकरीता वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवार दि. 28 मार्च रोजी शासन निर्णयासंदर्भात तपशीलवार परिपत्रक जारी केले असून त्यातून या महाविद्यालयासाठी 04 वर्षातील अंदाजीत खर्च, पद निर्मिती तसेच अन्य अत्यावश्यक गोष्टींना मंजूरी बहाल केली आहे.



वैद्यकीय शिक्षण खात्याचे अव्वर सचिव डॉ. पु. कोतवाल यांनी सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीतून मान्यता दिलेल्या प्रमाणे शासन निर्णय जारी केले आहेत. त्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नीत 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरु करण्यास मान्यता बहाल केली आहे. तसेच प्रस्तावित महाविद्यालयाकरीता आवश्यक तेवढी पद निर्मिती व पदे भरावयास मान्यता बहाल केली असून यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथिल केली आहे.



नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयाकरीता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे परभणी येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, अस्थिव्यंग रुग्णालय व स्त्री रुग्णालय निकषानुसार आवश्यक जागेसह (स्थावर जंगम मालमत्तेसह) तात्पूरत्या स्वरुपात वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता बहाल केली आहे.



परभणी येथील या महाविद्यालयाकरीता मौजे ब्रह्मपूरी ता. जि. परभणी येथील उद्योग विभागाने त्यांच्या नावे असलेली गट क्र. 2, 20, 47 व 53 येथील एकूण 52.6 हेक्टर आर. ही आवश्यक जमीन महसूल विभागास निःशुल्क हस्तांतरीत करुन देण्यास मान्यता बहाल केली आहे. सदर जमीन महसूल विभागामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागास निःशुल्क हस्तातरीत करण्यास मान्यता बहाल केली असून सदर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थलांतरीत करण्याससुध्दा मान्यता बहाल केली आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम, त्यासाठीच्या आवश्यक खर्चासही मान्यता बहाल करण्यात आली आहे. प्रस्तावित महाविद्यालयाकरीता एकूण 682 कोटी 76 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास मान्यता बहाल केली असून वेळोवेळी पूरक मागणीद्वारे निधी उपलब्ध करण्यासही मान्यता बहाल केली आहे.




 ⬇️⬇️⬇️ राज्य सरकारी परिपत्र   ⬇️⬇️⬇️















 ☢ बांधकामासाठी आणि आवश्यक पदे त्यावर 04 वर्षांत येणारा खर्च  

प्रशासकीय इमारत, अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विभाग, रुग्णालयातील इमारत, अधिकारी कर्मचारी आवास आणि विद्यार्थी वसतीगृह, आवश्यकतेनुसार अतिरिक्त बांधकाम यासाठी अंदाजे 60 हजार 242 चौ.मी. करीता 309 कोटी 63 लाख रुपये खर्च होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वर्ग-1, 2 विद्या वेतनाची पदे वर्ग-3 नियमित पदे, काल्पनिक पदे, बाह्यस्त्रोताने, वर्ग-4 कंत्राटी पदांकरीता 97 कोटी 60 लाख रुपये 4 वर्षासाठीच्या खर्चास मान्यता बहाल केली आहे.



या रुग्णालयातील आवश्यक पदे व त्यावरील 4 वर्षांच्या अंदाजीत 109 कोटी 19 लाख रुपयांच्या खर्चासह मान्यता बहाल केली असून यंत्र सामूग्री, आवर्तीत खर्च वगैरेंकरीताही एकूण 682 कोटी 76 लाख रुपये लागतील, असा अंदाजही व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी जारी केलेल्या या परिपत्रकाबाबत समाधन व्यक्त केले आहे.






Post a Comment

0 Comments