Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

युवतींनी समाज माध्यमांचा वापर विवेकाने करावा - डॉ.सारिका बुरगे 





परभणी ➡️ आजची समाज माध्यमे आपल्या जीवनात अनिवार्य झाली आहेत. अशावेळी समाज माध्यमातून दिले जाणाऱ्या प्रलोभनाला युवती बळी पडताना दिसत आहेत. लाईक्स, कॉमेंट्स जास्त मिळवण्यासाठी आपण गैरमार्गाचा वापर करायला लागतो. याचा परिणाम आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होतो त्यासाठी युवतींनी समाज माध्यमांचा वापर विवेकाने करावा असे प्रतिपादन प्रा.डॉ.सारिका बुरगे यांनी 29 मार्च रोजी केले.





येथील श्री शिवाजी महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी युवतींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या सत्राच्या अध्यक्ष म्हणून प्रा.सविता कोकाटे उपस्थित होत्या. यावेळी प्रा.वृषाली फुके, प्रा.स्वाती देशमुख, प्रा. श्रद्धा पांडे, प्रा.वैशाली वसमतकर आदींची मंचावर  उपस्थिती होती.



'सामाजिक माध्यमे आणि युवती' याविषयावर मार्गदर्शन करताना डॉ. बुरगे पुढे म्हणाल्या, जगातल्या एकूण समाज माध्यम वापरणाऱ्या स्त्रियांपैकी 60 टक्के ह्या हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या आहेत. समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे युवतीमध्ये नैराश्यासह आत्महत्यांचा विचार वृद्धिंगत होतो. समाज माध्यमे ही गॅससारखी आहेत जे गरजेचे ही आहे आणि त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. 



याचा अभ्यासावर ही परिणाम होतो त्यामुळे युवतींनी समाज माध्यमांचा अतिवापर टाळावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. युवतींना कर्तृत्ववान,  प्रतिभावान, हिम्मतवान बनायचे असेल तर खंबीर बनलं पाहिजे मग ते समाज माध्यम असो की आपले सामाजिक जीवन. युवतींनी समाज माध्यमे हाताळताना सक्षम व्हावे लागेल असे मत अध्यक्षीय समारोप करताना प्रा.सविता कोकाटे यांनी व्यक्त केले.



यावेळी कार्यक्रमाधिकरी डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.जयंत बोबडे, डॉ.दिगंबर रोडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्वाती देशमुख,  सूत्रसंचालन आरदवाडे वैष्णवी, तर आभार प्रदर्शन श्वेता हंगरगे यांनी केले.स्वागत गीत नेहा किरवले यांनी सादर केले पाहुण्यांचा परिचय ऐश्वर्या पाटील यांनी करून दिला.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पेदापल्ली, अच्युत तरफडे, दासू मस्के, सय्यद सादिक, साहेब येलेवाड, गणेश गरड, महेश बरुडा आदींनी पुढाकार घेतला. यावेळी परभणी, हिंगोली, लातूर,नांदेड या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या.



फोटो कॅपशन: श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी युवतींना मार्गदर्शन करताना डॉ.सारिका बुरगे, मंचावर प्रा. सविता कोकाटे, प्रा.स्वाती देशमुख, डॉ. वृषाली फुके आदी दिसत आहेत.






Post a Comment

0 Comments