Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सायाळा खटिंग ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ व युवकांनी घेतली जलसंधारणाची शपथ




परभणी ➡️ शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स, व्हेअर इट फॉल्स या मोहिमेला अनुसरून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पाणी बचतीचा संदेश पोहोचावा म्हणून सायाळा खटिंग ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ आणि युवकांनी जलसंधारणाची शपथ घेतली.






आज दिनांक 29 मार्च रोजी परभणी तालुक्यातील सायाळा खटींग या ग्रामपंचायतीमध्ये जलशक्ती अभियानांतर्गत परभणी जिल्हा परिषद आणि वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणीच्या कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जलशक्ति अभियान अंतर्गत जल शपथ आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 



यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, गट विकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. मधुकर खळगे, डॉ. अनुराधा लाड, विस्ताराधिकारी विश्वनाथ पुरी, सरपंच श्री काळे, ग्रामसेवक चंद्रमुनी चावरे, लेखाधिकरी विष्णू कारले, माऊली खटिंग, संवाद ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.




ग्रामीण भागातील नागरिकांना संधारणाचे महत्त्व कळावे या हेतूने जलशक्ति अभियान अंतर्गत 29 मार्च 2022 पासून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवानंद टाकसाळे म्हणाले की, युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्तीसाठी मार्गक्रमण करावे, युवक हे समाजातील खरी मिलिटरी फोर्स आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ ए पी जे अब्दुल कलाम यासारख्या महापुरुषांचा आदर्श घेऊन जीवन जगावे. ग्रामस्थ आणि युवकांनी मिळून गावात स्वच्छता, पाण्याचे नियोजन, वृक्षांची जोपासना, शौचालयांचा निमित वापर या सारखे समाजोपयोगी कामे हाती घ्यावीत. यावेळी गावाच्या परिसरात असलेल्या वृक्षांच्या संवर्धन करण्याचे आवाहन शिवानंद टाकसाळे यांनी गावकऱ्यांना केले.




यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी उपस्थित युवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की गावाची स्वच्छता व पाण्याचे संवर्धन करून समाजात जलसंवर्धनाचा संदेश द्यावा तसेच प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश प्राप्त करावे. आपल्या विनोदी शैली आणि संतांच्या दृष्टांतासह अध्यक्षीय समारोप करताना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव म्हणाले की, राष्ट्रीय स्वच्छता कर्मी म्हणून युवकांनी गावातील लोकांमध्ये पाण्याची बचत, वृक्षांची लागवड आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासारखी मौलिक कामे करावीत. 




तसेच जिल्ह्यातील ग्रामस्थांनी देखील जलशक्ति अभियानांतर्गत पाण्याचा अपव्यय टाळून त्याचे योग्य ते नियोजन करण्याचे आवाहन यावेळी ओमप्रकाश यादव यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण कापसे, सूत्रसंचालन डॉ. विजय कुमार जाधव यांनी तर आभार अनुराधा लाड यांनी केले.






Post a Comment

0 Comments