Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

वाळू माफियांनी अवैध वाळू उपसाला विरोध करणाऱ्या तरुणाचा काढा काटा 




परभणी ➡️ अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाळू माफियांनी मारहाण  केल्याने जखमी तरुणाचा उपाचारादरम्यान मृत्यू  झाला आहे. जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथे 24 मार्च रोजी ही धक्कादायक घटना घडली. मात्र गुन्हा आज नोंद करण्यात आला. माधव त्र्यंबक शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, गंगाखेड ठाण्यात 08 जणांविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 



पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार गंगाखेड तालुक्यासह पालम तालुक्यातील काही वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत. या वाळू घाटासह इतर ठिकाणाहून देखील वाळूमाफिया गौण खनिज उत्खननाच्या नियमाची पायमल्ली करत दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत. पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य यांचा मुलगा माधव त्रिंबकराव शिंदे हे रात्रीच्या वेळी गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यास विरोध करत होते. त्यामुळे प्रकाश डोंगरे व धक्यातील भागीदारांची माधव शिंदे यांच्यावर खुन्नस होती. 



24 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता मोटारसायकल रावराजूर गावातील आरोपी सुरेश उत्तमराव शिंदे हा चालवित होता व पाठीमागील सिटवर ओममप्रकाश ज्ञानोबा शिंदे हा बसला होता. त्या दोघांच्यामध्ये माधव त्रंबकराव शिंदे बसला होता. तसेच नदीपात्राकडे जाणारे रस्त्यावर त्या धक्याचे नविन ठेकेदार प्रकाश प्रभु डोंगरे व त्याचे भागीदार संदिप लक्ष्मणराव शिंदे भागवत प्रकाशराव शिंदे, नितीन खंदारे, राजेभाउ बोबडे व सर्जेराव विश्वनाथ शिंदे हे दिसले. तेथे रेती काढण्याचे काम चालु होते.


त्यावेळी तिथे उपस्थित माधव शिंदे यांनी रात्रीच्या वेळी वाळू नियमानुसार काढता येत नाही, असे सांगितले. रेती बंद होणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत आरोपी राजूभाऊ बोबडे याने हातातील रॉडने माधव शिंदे यांच्या कमरेखाली मारहाण केली. त्यानंतर प्रकाश डोंगरे याने शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच भागवत प्रकाश शिंदे, संदिप शिंदे, सर्जेराव शिंदे, ओमप्रकाश शिंदे, सुरेश शिंदे यांनी लाथाबुक्याने मारहाण केली. 



माधव शिंदे यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र 25 मार्च रोजी माधव शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 03 दिवस सदरील प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे येऊन श्रावण रामेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीवरून आरोपी प्रकाश डोंगरे, सुरेश शिंदे, ओमप्रकाश शिंदे, संदीप शिंदे, भागवत शिंदे, नितीन खंदारे, राजेभाऊ बोबडे, सर्जेराव शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. 





Post a Comment

0 Comments