Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दिव्यांग व्यक्तींसाठी पहिल्यांदाच परभणीत राज्यस्तरीय दिव्यांग सर्वधर्मीय सामुहिक विवाहाचे आयोजन - आ.डॉ.राहूल पाटील 





परभणी
➡️ दिव्यांग व्यक्तींसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यस्तरीय दिव्यांग सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा दि.27 एप्रिल रोजी परभणी येथे अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य आयोजक आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे़.







हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परभणी येथे राज्यस्तरीय दिव्यांगांचा सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे़  त्या अनुषंगाने विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी दिव्यांगांचा राज्यस्तरीय सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 



या मेळाव्यापासून आजपर्यंत 31 दिव्यांग जोडप्यांनी विवाह सोहळ्यात लग्न करण्यासाठी आपली नावनोंदणी केली आहे.  मागील दोन वर्षात कोरोनामुळे संपूर्ण देशातील आर्थिक परिस्थिती दयनीय झालेली आहे. यात दिव्यांगाची परिस्थिती काही वेगळी नाही.  हा विवाह सोहळा विनामूल्य करून देण्याचा निश्चय आ.डॉ.पाटील यांनी केला आहे. 




या विवाह सोहळ्यात वधू-वरांनी मणी-मंगळसुत्रासह सर्व संसारोपयोगी साहित्याचे वाटप आयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगाना या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह करावयाचा आहे. त्यांनी आपली नाव नोंदणी दि. 15 एप्रिलपुर्वी आमदार संपर्क कार्यालय, शिवाजी नगर, परभणी येथे करावी. या विवाह सोहळ्यात सर्व धर्माच्या रूढी- परंपरेनुसार विवाह लावण्यात येतील. 



या विवाह सोहळ्यासाठी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे देश पातळीवरील विविध मान्यवर तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहून वधू-वरांंना शुभाशिर्वाद देणार आहेत.  दिव्यांग बांधवांनी या विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करून लाभ  घ्यावा, असे आवाहन मेळाव्याचे मुख्य आयोजक आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments