Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

उक्कलगाव येथे शॉर्टसर्किटमुळे 12 एकरावरील ऊस जळून खाक 




परभणी ➡️ मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील शेतशिवारात शेतकर्‍यांचा 12 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली असून यात शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 



याबाबत सविस्तर माहिती अशी की, उक्कलगाव येथील शेत शिवार गट नं.327 मधील अनंता राजाराम पिंपळे, गट नं 327  डिगांबर रामराव पिंपळे, गट नं 328  गणेश बाबाराव पिंपळे गट नं 28  डिगांबर रामराव  पिंपळे, कैलास लक्ष्मण पिंपळे यांच्या शेतातील एकूण 12 एकर क्षेत्रात असलेला ऊसं विद्युत खांबावरील शॉट सर्किट झाल्याने उसाला आग लागली. यात  मोठया प्रमाणात शेतकर्‍यांचे आर्थीक नुकसान झाले आहे. आग लागल्याच्या  या घटनेची माहिती मिळताच मानवत नगर परिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.




यावेळी अग्निशमन दलाचे फायरमन मुकेश कुमावत, राम दहे, संदीप जाधव, वाहन चालक सय्यद कलीम, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी  ही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवून आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच महसूलचे मंडळ अधिकारी बिडवे , उक्कलगाव सज्जाचे तलाठी अमोल गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देवून ऊसाला अचानक लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.




Post a Comment

0 Comments