Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कर्मचाऱ्यांना पी.एफ रक्‍कमपासून वंचीत ठेवणारी शुगर कंपनीच्या विरोधात कारवाई करा - स्वाभिमानी शेतकरी संघटना




परभणी ➡️ अमडापूर येथील लक्ष्मी नरसिंह शुगर प्रा.लिमीटेड कंपनी मध्ये 2018 पासून सुरक्षा रक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना पी.एफ रक्‍कम मुद्दाम दिली जात नाही.  तसेच कंपनीत काम कोणताही कर्मचारी जखमी झाल्यास त्याला कोणती आर्थिक बदत केली जात नाही.  उलट मदत मागितले तर कर्मचारीला नोकरी वरुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते. या कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीचे निवेदन आज 29 मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी व सरकारी कामगार अधिकारी यांना देण्यात आले. 




यात सर्व अर्जदार हे सन 2018 पासून गैरअर्जदाराने श्री. लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना प्रा.लि. यांच्याकडे कायदेशीर रित्या सुरक्षा रक्षक म्हणून कामास आहे. त्यांना गैरअर्जदार कारखाना यांच्याकडून, नियमीत वेतन दिले जात आहे. परंतु सन 2018 पासून गैरअर्जदार कारखाना सर्व अर्जदारांचे हक्काची पि.एफ. व ए.एस.आय. सी. ची रक्‍कम आज पर्यंत अर्जदार यांच्या नावे पि.एफ व ए.एस.आय. सी खाते खोलुन पि.एफ.ची व ए.एस.आय.सी रक्‍कम मुदाम होऊन जमा केली नाही.


 परभणी  तालुक्यातील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स आमडापुर ह्या कारखान्यात पंचक्रोशीतील गाव - गाड्यातील 35 मुले या कारखान्यात गेली 04 ते 05 वर्षांपासून काम करत आहेत. कारखान्याची 400 एक्कर जमीन आणि कारखाना हे फक्त 35 लोक सभाळतात त्यात 07 लोक कायम आहेत. त्या 07 लोकांचाच पी.एफ (P.F.) भरल्या जातो. बाकीच्याचा P.F. मात्र भरल्या जात नाही. मागील चार वर्षाचा P.F. कारखान्याकडे बाकी आहे.हे तर सोडाच परंतु कारखान्यात अनेक अपघात झाले काही लोक गंभीर जखमी झाले. कारखान्याने त्यांचा खर्च दिलाच नाही उलट त्या सर्वांना आगामी एक तारखेपासुन कामावरून कमी करणार असल्याची धमकी त्यांना दिली जाते.
             


कायद्यानुसार पि.एफ. ची रक्‍कम ही कामगाराच्या भविष्यासाठी उपयोगी पडत असल्यामुळे सुध्दा सर्व अर्जदार यांना पी.एफ.रक्कम न जमा केल्यामुळे त्यांच्या कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व अर्जदार यांनी गैर अर्जदार कारखाना यास वेळोवेळी हक्काच्या पी.एफ. बाबत वारंवार मागणी केली. कारखानेकडून हा मुदाम होऊन पी.एफ.ची रक्‍कम जमा करण्यास टाळाटाळ करीत आहे.




पी.एफ.ची रक्‍कम कायद्याने कामगाराच्या नावे पी.एफ. खाते खोलुन जमा करणे हे बंधनकारक असून देखील संबंधीत कंपनीकडून ही रक्कम जमा केली. या संदर्भात सर्व अर्जदारांनी मागील आठ दिवसापुर्वीं पी.एफ. रक्कमची मागणी केली असता उलट कारखान्याच्या संबंधीत अधिकाऱ्याने सर्वांना धमकी दिली की, जर तुम्ही पी.एफ. ची मागणी यानंतर केली तर आम्ही कामावरुन कमी करुन तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुक करुन. यामुळे सर्व अर्जदार आज रोजी आथिक  व मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्यात येत आहे.

   


तसेच मागील 10 दिवसापुर्वी सर्व अर्जदारा पैकी कृष्णा मोतीराम दुधाने हा कारखानमध्ये आपले कर्तव्य बजावत असतांना बैलगाडीमुळे मांडीला गंभीर मार लागुन 12 टाके पडले. तरीपण कारखाना सदरच्या अर्जदारास कुठलाही वैद्यकीय खर्च अथवा पगारी इ. कायदेशीर सवलत आजपर्यंत दिली नाही. तरी पण गंभीर दुखापत होऊन देखील आजपर्यंत आपले कर्तव्य बजावत आहे. यात अर्जदार बाबाराव पुरभाजी खटींग हा देखील आपले कर्तव्य बजावत असतांना मळी जळल्यामुळे त्याच्या पाय अंदाजे 100% जळाला असून देखील कारखाना यांनी आज पर्यंत त्यास कुठलाही मेडिकल खर्च अथवा पगारी रजा इ. कायदेशीर सवलती दिल्या नाही. म्हणून अर्जदार हे वरील गंभीर दुखापती मुळे आजपर्यंत मानसिक व आर्थिंक संकटात सापडले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन या प्रकरणाची चौकशी करुन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावे. 



सर्व अर्जदार यांना त्वरित पी.एफ. ची रक्‍कम देण्याचे गैरअर्जदार यांना आदेश देण्यात यावे. तसेच वरील दोन अर्जदार कर्तव्य बजावत असतांना झालेल्या गंभीर दुखापतीची' सखोल चौकशी करुन कायदयानुसार त्यांना सर्व सवलती देण्याचे आदेश देण्यात यावे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, शेख जाफर, रामप्रसाद गमे आदीचे हस्ताक्षर आहे.





Post a Comment

0 Comments