Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हा परिषद भ्रष्टाचार मुक्त करून टोल मुक्त करणार - आ.डाँ.रत्नाकर गुट्टे 




✴ रा. स. प  जिल्हा परिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार 

🔯  आरूणा शर्मा  🔯

 पालम  ➡️ परभणी जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला असून टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास खुंटला असून जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार बंद करून टक्केवारी बंद करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पालम येथे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.




जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दुरदृष्टी नेतृत्वाची गरज असून जिल्ह्याचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतो. यासाठी जिल्हा परिषदेवर निवडून येणारे सदस्य हे निष्कलंक व विकासाची दृष्टी असणारे पाहीजेत. सध्या परिस्थिती पाहता परभणी जिल्हा परिषदेत केवळ भागिलेचे राजकारण सुरु आहे. त्यातून विकासकामांना तिलांजली देत केवळ आपला स्वार्थ साधण्याचे काम राजकारणी करत आहेत. जिल्ह्याचा, सर्वसामान्य नारिकांचा, शेतकर्‍यांचा विकास करावयाचा असेल तर विकासाभीमुख नेतृत्वाच्या हाती जिल्हा परिशदेची सत्ता असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या भूमिकेतून आपण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत आपण पूर्णपणे ताकदीनिशी उतरणार असून या जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मतदारांनी आम्हाला सहकार्य करावे. 



शहरी भागाच्या विकासासाठी जसे नगरपालिका,महापालिका आहेत त्याच प्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आहेत. या पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्ये जिव्हाळ्याचे असलेले प्रश्‍न सेाडविण्यासाठी आम्ही पुढे येत आहोत.  परभणी जिल्हा हा शेतीबहुल जिल्हा असून येथील 80  टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळं या शेतकरी, शेतमजूरांचं जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बहुसंख्य असेलेल्य शेतकरी कुटूंबांसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्‍न म्हणजे रस्ते, वीज, पाणी व आरोग्य हे चार मुद्दे महत्वाचे आहेत. या चारही मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहून काम करणार आहोत. 




जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हाभरातील ग्रामीण भागात जोडणारे रस्ते तयार करुन गावांना शहराशी जोडल्या जाईल. ज्या भागात सिंचन सुविधा कालव्याद्वारे व इतर माध्यमातून करता येते त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. जायकवाडी, येलदरी व सिध्देश्‍वर या धरणातील पाणी कालव्यांद्वारे देण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती, त्यातील गाळ काढणे, बांधकाम करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर येलदरी धरणाला उजवा कालवा निर्माण करुन आणखी सिंचनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वीजेचा प्रश्‍नही मोठ्या प्रमाणात असून हा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडं पाठपुरावा करुन हा प्रश्‍न सोडविण्यात येईल. ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्यचे प्रश्‍न देखील तितकेच महत्वाचे आहेत.




जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था हालाखीची झाली असून या शाळा देखील अद्यावत झाल्या पाहीजेत, शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या पाहीजेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक असले पाहीजे अशा विविध अंगांनी शिक्षण विभागाला आधुनिककरणाची जोड देत ग्रामीण विद्यार्थी मुख्य प्रवाहात आणण्यााठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधांच्या बाबतीत अजूनही जिल्हा खुप मागे आहे. काही दिवसापूर्वी तर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना रुग्वाहिकाच नव्हत्या. मी माझ्या निधीतून या रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या असून गंगाखेड मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केद्र, उपकेंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांची सुविधा झाली आहे. मात्र जिल्हाभरातील हे चित्र बदलण्यासाठी विकासाभीमुख नेतृत्वाच्या हाती जिल्हा परिषद जाणे आवश्यक आहे.





केवळ भागीदारीचे  राजकारण करणार्‍या राजकारण्यांना घरचा रस्ता दाखवून लोकाभिमुख, विकासाभिमुख असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या हाती जिल्हा परिशदेची सत्ता असल्यास विकास काय असतो याची चुणूक आम्ही दाखवून देवू. आमचे नेते महादेवजी जानकर यांच्या संकल्पनेतील ग्रामविकास आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांची फळी घेवून आम्ही या निवउणूकीत उतरत आहोत. जिल्हा परिशद आणि पंचायत सिमितीच्य सर्वच्या सर्व जागा आम्ही लढणार असून जिल्ह्याच्या विकासाची धुरा आमच्या खांद्यावर घेणार आहोत. जिल्हा परिषद भटाचार व टक्केवारी मुक्त करण्यासाठी रा. स. प जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवणार असून जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पालम येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.




 या पत्रकार परिषदेला जि.प. सदस्य राजेश फड, रासपचे जिल्हाध्यक्ष  अँड संदीप आळनुरे,विधानसभा अध्यक्ष क्रष्णा सोळंके, पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे बाळासाहेब कुरे ,उबेदखा पठाण , अजीम पठाण, रहीमतुलाखाँ पठाण, अशादुलाखाँ पठाण, शेख गौस,बाबासाहेब एंगडे, गणेशराव घोरपडे,गफार कुरेशी,चंद्रकांत पौळ, गजानन भस्के, बाळासाहेब कराळे,राहुल शिंदे, पुरोषतोम लांडगे,काशीनाथ कदम,गौस कुरेशी,विनायक पौळ आदी उपस्थित होते




Post a Comment

0 Comments