Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राज्य सिनिअर टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात परभणी, महिला गटात बीड विजेता





पुरुष गटात परभणी व महिला गटात बीड विजेता संघा सोबत टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे,राज्य सहसचिव किशोर चौधरी, जयकुमार सोनखासकर, रामेश्वर कोरडे, प्रकाश उदासी, अभय धोबे, शाहीद सय्यद आदी उपस्थित होते. 


यवतमाळ ➡️ टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या मान्यतेने, आ.मदानभाऊ येरावार यांच्या सहकार्याने व टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन यवतमाळ यांच्या वतीने दि. 26 ते 28 नोंव्हेबर दरम्यान संपन्न झाली. यात राज्य सिनियर पुरुष गटात परभणी तर महिला गटात बीड जिल्हा तर मिश्र दुहेरी गटात सोलापूर अजिंक्य ठरला. 




💠 पुरुष गटात उपांत्य फेरीत परभणी संघाने लातूर संघाचा 2-1 सेट मध्ये कडवी झुंज देऊन अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सोलापूर संघाने नवी मुंबई चा 2-1 पराभव करत अतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात परभणी वि. सोलापूर संघात अतितटीची लढत होऊन 2-1 सेट मध्ये परभणी- प्रथम, सोलापूर -व्दितीय, तर लातूर -तृतीय स्थान प्राप्त केला. 

💠महिला गटात : बीड - प्रथम, चंद्रपूर- व्दितीय, तर यवतमाळ- तृतीय ठरला. 

💠 मिश्र दुहेरी- सोलापूर- प्रथम, परभणी- व्दितीय, बीड - तृतीय.

💠वयस्कर गटात : एकेरी मध्ये साहेबराव राठोड -प्रथम (यवतमाळ ), जयकुमार सोनखासकर-व्दितीय (अकोला), किरण घोलप (नाशिक). 

💠 दुहेरी गटात-हिंगोली, यवतमाळ, परभणी, अनुक्रमे विजयी ठरले.



बक्षिस वितरण सोहळा टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्य संघटनेचे अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, डॉ. रामपूरकर, संजय कोल्हे, डॉ. विकास टोणे, विभागीय सचिव जयकुमार सोनखासकर, रामेश्वर कोरडे, राज्य सहसचिव किशोर चौधरी, संजय सातारकर, जिल्हा सचिव अभय धोबे, उपाध्यक्ष प्रकाश उदासी, प्रा. निलेश भगत,सहसचिव शाहीद सय्यद, रवींद्र पाळेकर,विकास शेळके, मीर सर, गिरीराज गुप्ता, आदी उपस्थित होते. स्पर्धेत पंच मंडळ अध्यक्ष प्रफुल्ल कुमार, सतिश नावाडे, प्रमोद महाजन, गजानन शिंदे, गणेश पाटील, अक्षय गामणे,विवेक मल्लिक, यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विकास टोणे यांनी केले. 






Post a Comment

0 Comments