Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला जि.प सदस्य नानासाहेब राऊत यांनी दत्तक घेऊन दिला मदतीचा हात




मुलाच्या घरी खर्या अर्थाने दिवाळी साजरी

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन समाजापुढे ठेवला आदर्श

जिंतूर ➡️ सेलू तालुक्यातील देवगाव फाट्याजवळील नांदगाव येथील मधुकराव थोरात यांच्या मुलगा रखमाजी मधुकर थोरात याचा परभणी येथे शिक्षण सुरू असताना अपघात घडला व त्यात जखमी झाल्याने शिक्षण व उपचारासाठी लागणारा खर्च आणि घरच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर शिक्षणाची व आरोग्याची फार मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे माझी जि. प. सदस्य तथा ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत यांनी महात्मा फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून सदरील मुलाला दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची व आरोग्याची संपुर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. 



बाबत अधिक माहिती अशी की,  नांदगाव येथिल मधुकर थोरात हा अल्पभूधारक शेतकरी त्यात कोरडवाहु त्यामुळे परिस्थिती बेताची 01 मुलगा व 04 मुली, मुलगा हुशार डॉक्टर होण्याचे स्वप्न एसएससी परीक्षेत 95 टक्के मार्क असल्याने मुलगा अभ्यासात हुशार असून देखील परिस्थिती मुळे आपले शिक्षण खुंटते कि काय अशी भीती त्याच्या मनात होती.  



त्यातच अचानक शाळेत इमारतीवरून पडल्याने जखमी झाल्याने त्यातही अर्थिक अडचणीत सापडल्याने संपुर्ण परिवार अडचणीत होता परंतु येथिल माउली थोरात यांनी सदर परिस्थिती ओ. बी. सी. नेते नानासाहेब राऊत यांना सांगितली आणी त्यांनी आरोग्य व शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी उचलुन त्याला दत्तक घेतले त्यांच्याकडून मिळालेल्या आधाराने मी नक्कीच शिक्षणात मोठे होण्याचे स्वप्न साकार करेल अशी कबुली रखमाजी थोरात यांनी यावेळी दिली.



सध्या तो बारावीला असून त्याच्या प्रकृती अभावी तो फॉर्म भरू शकला नाही परंतु पुढल वर्षी उपचारांनंतर नव्या उमेदीने पुन्हा जोमाने शिक्षण संपादन करुन आपले नाव उज्वल करून असी अशा त्यांचे वडील मधुकर थोरात यांनी व्यक्त केली. समाजामध्ये राजकारण करत असताना आपण देखील समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने तसेच महात्मा फुले यांच्या विचाराने मी महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी आपल्या हातून चांगले कार्य घडावे म्हणून रखमाजी थोरात यास दत्तक घेतले आहे. त्याच्या घरात खर्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याचे दिसून आले. हिच फुलेंना खरी श्रध्दांजली असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. 




त्याच बरोबर राजकारणा बरोबर समाज कार्य करत असताना मी आतापर्यंत नऊ मुला -मुलींना दत्तक घेऊन त्यातील एका मुलीचे कन्यादान देखील केले आहे आणी माझ्या मदतीतून गरिब होतकरु मुलांनी चांगल्या पदापर्यंत पोहचुन आपले शिखर गाठवे असे मत नानासाहेब राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार प्रभाकर कुर्हे, बद्रोदीन काझी, वडील श्री मधुकर राव थोरात श्री अशोक थोरात गावचे सरपंच बाजीराव गडदे माऊली ढोणे गोविंदराव गडदे निवृत्ती थोरात शिवाजीराव थोरात भास्कर गडदे रामा ढोणे आदींची उपस्थिती होती.







Post a Comment

0 Comments