Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ऊसाने भरलेले ट्रॅक्टर घरावर उलटले; ढिगार्‍याखाली दबून महिलेचा मृत्यू 




 

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील दुर्देवी घटना 

परभणी ➡️  ऊस घेऊन साखर कारखान्याकडे निघालेल्या भरधाव ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या घरावर उलटले आणि यात उसाच्या ढिगार्‍याखाली दबून घरातील 55 वर्षीय महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. तर एक 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज मंगळवारी (दि.30) पहाटे 5 वाजता पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे घडली. या घटनेत घरात पलंगाच्या बाजूला झोपलेली पुष्पा पवार ही महिला सुदैवाने बचावली आहे. 



प्राप्त माहितीवरून पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकर्‍याचा ऊस माजलगाव येथील खाजगी साखर कारखान्याला गाळपास नेला जात होता. मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास शेतातून उसाची ट्राली भरून एक ट्रॅक्टर बाभळगाव येथून जात होता. यावेळी ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या घरावर उलटले. 



यावेळी घरात पलंगावर झोपलेल्या पारुबाई रंगनाथ पवार (55) आणि त्यांची नात शिवानी संजय जाधव ( 8 ) या दोघी ऊसाच्या ढिगाखाली गाडल्या गेल्या. अचानक अंगावर कोसळलेल्या उसाच्या मोळ्यांने पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या आजीसह नातीला काहीच हालचाल करता आली नाही. 



अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. पारुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची नात शिवानी जाधव गंभीर जखमी आढळून आली. जखमी शिवानीला तातडीने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments