Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

राजस्थानी येथील 04 व्यापाऱ्यांनी जिंतूरच्या मिल मालकांना लावला 18 लाख रुपयांचा चूना





जिंतूर
➡️  राजस्थानी येथील 04 व्यापाऱ्यांनी जिंतूर येथील एका ऑईल मिलच्या मालकांना  17 लाख 69 हजार 784 रुपयांची फसवणूक केली. या चौघांविरुद्ध 28 नोव्हेंबर रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे राहणारे हेमंत अग्रवाल (वय 42) यांची जिंतूर येथील एमआयडीसीमध्ये श्री अग्रसेन ऍग्रो इंडस्ट्रीज नावाची ऑईल मिल आहे. हेमंत अग्रवाल 1 मार्च 2013 पासून त्याच्या ऑइल मिलचे कामकाज पाहत आहेत. या ऑईल मिलमध्ये सरकी पासून पेंंड आणि तेल तयार केले जाते.




जैन ब्रोकर एजन्सी 343 शॉपिंग सेंटर रावतबाला रोड कोठा राजस्थानचे रहिवासी मालक मुकेश जैन हे गेल्या 03 महिन्यांपासून हेमंत यांच्याकडे मोबाईल फोनवर व्यवसाय आणि किंमत (किंमत) विचारत होते. हेमंतने 1 नोव्हेंबर 2021 रोजी केपी ॲग्रो फूड्स साउथ भामोश मंडी कोटा या नावाने मोबाईल फोनवर एक ट्रॉली पेंडचा सौदा केला. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2021 रोजी आर.जे-17-जीए-7877 हे वाहन या वाहतुकीत भरण्यासाठी सैराष्ट राजस्थान रोडजवळ नांदेडला पाठवले. 




आम्ही आमचे आइल मिल मधुन त्यांनी दिलेल्या पत्यावर पाठवुन दिली. त्यानंतर दि.15/11/2021 रोजी अंदाजे वेळ दुपारी 02:24 वाजता एक ट्राला गाडी सरकी पेंड महाविर फुड प्रोडक्स कोटा राज्यस्थान मोबाईलवर  सौदा नोंदविला त्यांनी नंतर दि. 20/11/2021 रोजी चौधरी ट्रान्सपोर्ट कंपनी नांदेड मार्फत गाडी क्र. RJ-18-GA-5154 पेंड भरण्यासाठी पाठविली.  त्यात गोदावरी मारकाचे 671 कट्टे ज्याचे वजन 295.24K.G. आहे. बिल क्र. C539/2021-22 एकुण रक्कम 8,09,253/- रु हे वाहन रवाना केले. नंतर आम्ही त्याला फोनद्वोर मेट बाबत विचारणा केली आसता. 



आज टाकतो उदया टाकतो, कधी सुटटीचे कारण दाखवुन तर कधी बाहेरगावी असल्याचे कारण दाखवुन तसेच ANTI CORRUPTION FOUNDATION OF INDIA, NATIONAL.CO-ORDINATOR (INDIA) असल्यामुळे मी पंजाबला मिंटीगला गेल्याचे कारण सांगत होता. नंतर दि.20/11/2021 रोजी सकाळी म्हणाला की, आज तुमचे पेंमेट बॅकेतुन करुन टाकतो. बॅकेची वेळ संपल्यानंतर मी त्याला फोन केला असता पेंमेट माझे खात्यावर जमा झाले नाही. तर त्याने मला माझे कारचा अपघात झाला आहे असे सांगितले. त्यांने मला आपघात झालेचे फोटो मला व्हाट्सअपद्वारे पाठविले व तुमचे पेंमेट मंगळवारी करतो. मी दवाखान्यात ॲडमीट आहे असे सागितले. परत मी मंगळवारी सकाळी पेंमेट बाबत फोन केला असता आज काही व उदया काही पेंमेट करुन देतो म्हणाला.



त्यानंतर त्याने आज पर्यंत ही माझे पेंमेट केले नाही. मग आम्ही व्यापा-यामार्फत चौकशी केली असता तो असाच मिल मार्फत पेंड मागवुन परस्पर संगणमत करुन विक्री करतो असे व्यापारी म्हणाले. नंतर आम्ही गाडी क्र. RJ-17-GA-7877 चा चालक मोहमंद आशपाक यास दि.26/11/2021 रोजी मोबाइलवर फोन करुन विचारले असता त्याने सांगितले की, आपण दिलेल्या पत्तावर दुकान आढळुन आले नाही नंतर त्यांने आमचे ब्रोकर जैन ब्रोकर एजन्सी यांना फोन केला असता.


त्यांनी त्याला विशाल टेनीग कंपनी(राम करनजी परीता) मोबाईलवर रावत बाटा रोड कौटा येथे काही प्रमाणात सरकी पेंड व बाकी बंजरगलाल राठोड नांदता (कौटा) येथे बाकीचे सरकी पेडचे कट्टे उतरविले असे सांगीतले वाटसपद्वारे चालक यांने मला दि.26/11/2021 फोटो पाठविले व गाडीचा किराया देण्यासाठी ब्रोकर मुंकेश जैन हा आला असता त्याचे हि काढलेले फोटो मला पाठविले. संशय आलेल्यानंतर फिर्यादीने GST प्रोर्टलवर K.P आगो फुस GST NO 01AGJPJ3654N2ZV सर्च केला असता.



त्या दुकानचे मालक शरमीला जैन असल्याचे माहिती मिळाली तसेच महावीर प्रोडक्सचा GST NO 08AFFPJ9966E2ZI सर्च केला असता त्या दुकानचे मालक मुकेश जैन असल्याचे कळाले नंतर ब-याच वेळस माझा दोन्ही चे नंबर वरुन फोन केला असल्याने तो उचलत नसल्याने मी वेगवेगळा नंबर वरुन ब्रोकर जैन एजन्सी चे मालकाने एक ही फोनचे उचलुन उत्तर दिले नाही. 



त्यांनी पेंमेट देण्यास टाळाटाळ केली तसेच त्यांनी संगणमत करुन माझे मालाचे एकुण 17,69,784/-रुपये (अक्षरी सतरा लाख 69 हजार 784 रुपये ) म्हणुन माझी मुंकेश जैन, शरमीला जैन, बंजरगलाल राठोड, नांदता (कोटा), राम करनजी परीता यांनी माझी संगणमत करुन फसवणुक केली. म्हणुन हेमंत अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिस ठाण्यात या 04 आरोपींविरुद्ध भादंवि कलम 406, 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 











Post a Comment

0 Comments