Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केली पाहणी




 परभणी  ➡️ कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आरोग्य सेवेच्या सुविधेसंबंधित शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णालयाची पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या.


त्यांनी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा परिषद कोव्हीड रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोव्हिड रूग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत व स्वच्छते बाबत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. 


तसेच दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व केमिस्ट असोसिएशन यांची बैठक घेत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात rt-pcr चाचण्या वाढविणे व लसीकरणास गती देण्याबाबत सूचना केली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, डॉ. हमीद करीम, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची उपस्थित होती. 






Post a Comment

0 Comments