Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत रविवारी दोन हजार 413 नागरिकांचे झाले लसीकरण 





परभणी ➡️ स्थानिक महानगर पालिकेच्या वतीने कोविड – 19 अंतर्गत शहरात 45 बुथवर लसीकरण मोहीम राबवीण्यात आली आहे. या वेळी आयुक्त देविदास पवार, उपायुक्तप्रदिप जगताप यांनी सर्व बुथवर पाहणी करुन नागरीकांना लसीकरण करण्याचे आवाहान केले. 


परभणी शहरामध्ये मध्ये दि. 29 /11/2021 रोजी 2413 लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. शहरामध्ये प्रत्येक प्रभागांतर्गत नगरसेवक, सहायक आयुक्त,पालक अधीकारी यांच्या सहायाने प्रत्येक बुथ वर आशा वर्कर, एएनएम, अंगणवाडी ताई, मनापाचे  कर्मचारी व आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहीम यशस्वारित्या राबविण्यात येत आहे. 



प्रत्येक नागरीकांच्या घरी जावुन लस घेतली किंवा नाही याची शहानीशा करुन त्यांना लस देण्यात येत आहे. तसेच सर्वांनी सकाळी 9 ते 2 व दुपारी 2 ते रात्री 9 पर्यत लसीकरण चालू असणार आहे. तरी नागरीकांनी  लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महापौर मा.सौ.अनिता रविंद्र सोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, उप महापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते सयद समी ऊर्फ माजुलाला, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गट नेते चांद सुभाना जाकेर खान, सौ. मंगल  मुदगलकर, चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments