Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आधार केंद्र चालकांनी जादा शुल्क आकारल्यास लेखी तक्रारी करा – जिल्हा प्रशासनाचे आवाहन





परभणी ➡️ जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांनी निश्‍चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारावे, शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारणार्‍या आधार केंद्र चालकांविरोधात ग्राहकाची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. 


परभणी जिल्ह्यात सद्यस्थिती 46 आधार नोंदणी केंद्र सुरु आहेत. आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्डवरील नाव, जन्म तारीख दुरुस्त करणे इत्यादी कामे आधार केंद्रात केली जातात. आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी युआयडीएआयने दर निश्‍चित केले आहेत. आधार केंद्र चालक यांनी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी युआयडीएआयने निश्‍चित केलेले दर आधार केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत.


✴ आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी युआयडीएआयने दर निश्‍चित केले आहे, ते खालील प्रमाणे.


1)  आधार नोंदणी ही निःशुल्क आहे. 

2) 0 ते 5 वर्षानंतरच्या अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेटसाठीची प्रक्रिया निःशुल्क आहे. 

3)  फिंगरप्रिंट व फोटो अद्यावतीकरणासाठी 100 रुपये शुल्क आहे.

4) पत्ता, जन्मतारीख, मोबाई क्रमांक अद्ययावतीकरणासाठी 50 रुपये शुल्क आहे. 

5) आधारकार्ड डाऊनलोड आणि कलर प्रिंटसाठी 30 रुपये शुल्क आहे. 


जिल्हा प्रशासनाने या प्रेसनोटद्वारे म्हटले असून नागरीकांनी आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी जी फिस आकारली जाते, त्या फिसची पावती संबंधित केंद्रचालकांकडून हस्तगत करावी, असे आवाहन डॉ. कुंडेटकर यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments