Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सुट्ट्यात वाढ करण्याची शिक्षकांची मागणी 





परभणी ➡️ जिल्ह्यातील गंगाखेड,  मानवत,  परभणी, पाथरी, पूर्णा आणि सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी 2021-22 या वर्षीच्य् दिवाळीच्या सुट्टया संदर्भात 27 आक्टोंबर रोजी समग्र शिक्षा जि.प कडून जारी एका आदेशाने 04 ते 07 नोव्हेंबर पर्यंत मंजूर केले होते. परंतु या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी दिपावलीच्या सुट्ट्या मध्ये बदल करून सदर सुट्ट्या हे दि. 01/11/2021 पासून दि.10/11/2021 पर्यंत देण्यात यावे अशी मागणी निवेदन आज 29 आक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी ऑचल गोयल यांना देण्यात आले.


शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इयत्ता 06 ते 10 वी चे वर्ग दि.25/10/2021 रोजी ऑफलाईन मध्ये नियमित शाळेत सुरु करण्यात आलेले आहेत. या पूर्वी सदरील शाळेचे कामकाज 01 जून 2021 पासून सुरु करण्यात आलेले आहे.या कालावधीत प्रवेशासाठी विविध गावांना भेटी देणे,पात्र मुलींचा शोध घेणे ई कामे 15 जून पर्यंत करण्यात आलेली आहेत. 16 जून 2021 पासून दर्रोज ऑनलाईन वर्ग दररोज घेण्यात आलेले आहेत. तसेच ज्या मुलींकडे Android मोबाईल उपलब्ध नाही त्याच्या साठी अभ्यास गटाचे नियोजन करण्यात आलेले होते.


👇 आधी मंजूर करण्यात आले जिल्हा प्रशासनाचे आदेश 👇




सदरील अभ्यास गटास नियमित पने सर्व शिक्षिका भेट देत आलेल्या आहेत.तसेच मुलींसाठी झेरोक्स प्रश्न संच तयार करून नियमितपणे मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्यात येत होते. बाजाराच्या दिवशी प्रत्यक्ष्य मुली शाळेत बोलावून त्यांच्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत होते.सदरील कालावधीत सर्व कर्मचारी शाळेत नियमित उपस्थित राहून शाळेची नियमित कामे पार पाडण्यात आलेली आहेत. 


कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मार्गदर्शक पुस्तिका सन 2008-2009 या पुस्तिकेत शालेय सुट्ट्या संदर्भात दिवाळीच्या सुट्ट्या वसुबारस पासून 15 दिवस मान्य करण्यात आलेल्या आहेत.सदरील मार्गदर्शक पुस्तिका 2013-14 मध्ये बदल करण्यात आलेली असून सदरील पुस्तिकेत सुट्ट्या संदर्भात प्रकरण क्र.07 मध्ये मुद्दा क्र.7.5 वर पान क्र.५४ मध्ये शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी सर्व शाळे साठी जाहीर केलेल्या सुट्ट्या प्रमाणेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास सुट्ट्या राहतील असे सांगितलेले आहे.



त्यानुसार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय 16 जून 2021 पासून सुरु होणे अपेक्षित होते परंतु सदरील शाळा ह्या 01 जून 2021 पासून सुरु झालेल्या आहेत. सदरील शाळेत कार्यरत माविका अंतर्गत कर्मचार्यांना 10 महिन्याचेच मानधन मान्य आहे सदरील कालावधीत शाळा सुरु ठेवल्यास सदरील कालावधीचे मानधनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सदरील विद्यालयात सन 2021-22 मध्ये के.जि.बी.व्ही.व माविका योजनेसाठी वस्तीगृह अनुदान प्राप्त झालेले नाही.



तसेच माविका अंतर्गत कार्यरत शिक्षिकांचे माहे जून 2021 पासूनचे मानधन अनुदान नसल्याने अदा करण्यात आलेले नाही. दिपावलीच्या सुट्ट्या दीर्घ कालावधीच्या असल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांनी बाहेरगावी नियोजन केलेले आहेत. सदरील कालावधीतील सुट्ट्या अचानक रद्द करण्यात आल्याने व दिवाळी सारख्या मोठ्या सणासाठी महिला कर्मचार्यांना वेळ मिळणार नाही. सदरील कर्मचारी हे अत्यंत अल्प मानधनावर रु.4500 ते 26250 या मानधनावर कार्यरत असल्याने घरकामासाठी स्वतंत्र माणसाकडून काम करून घेणे शक्य होणार नाही. म्हणून या वर्षी दिपावलीच्या सुट्ट्या मध्ये बदल करून सदरील सुट्ट्या दि.01/11/2021 पासून दि.10/11/2021 पर्यंत देण्यात याव्यात यांवे अशी मागणी करण्यात आली. 


 




Post a Comment

0 Comments