Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलूतील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्याकडून गंभीर दखल





सेलू [ श्रीपाद रोडगे ] ➡️ शहरातील गुलमोहर कॉलनीत गुरुवारी (दि.28) पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी एका व्यापार्‍याच्या निवासस्थानी धूमाकुळ घालून 6 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच मागील काही दिवसांपासून सेलूत चो-यांचे वाढते प्रमाण याची जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी गांभीर्याने दखल घेवून घटनास्थळी भेट देवून तपासाकरीता पथके स्थापन केली आहेत.



व्यापारी शेख सिद्दीक शेख मोईन बागवान यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी छतावरील जिन्याचा दरवाजा तोडून प्रवेश केला. आतील सर्व खोल्यांना कड्या लावल्या व कुटूंबातील काही सदस्यांना चाकूचा धाक दाखवून अंगावरील तसेच कपाटातील सोन्याचे दागिणे हिसकावून घेतले. तसेच शेजार्‍यांना जाग आल्याबरोबर मारहाण करीत तेथून ते चोरटे पसार झाले. 



या दरोडेखोरांनी जवळपास 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोर सशस्त्र होते. या घटनेत दोघांना मार लागला. दरम्यान, सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला करीत तपास सुरु केला आहे. या शहरात गेल्या पाच दिवसात मोठ्या प्रमाणावर चो-या, दिवसाढवळ्या चो-या दागिणे हिसकावून पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.


त्यामुळे सेलू शहरात मोठी दहशत पसरली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक मीना यांनी सेलूत भेट देवून पोलिस अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली, घटनास्थळी भेट दिली. कुटूंबियांबरोबर चर्चा केली अन् तपासाकरीता पथके स्थापन केली आहे.




Post a Comment

0 Comments