Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन






मुंबई ➡️ कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांनी आपल्या अभिनयातून कायमच आपल्या चाहत्यांची मने झिंकली आहेत. मात्र आज सकाळी चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आज सकाळी 11.44 वाजता बेंगळुरच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. अशी माहिती समोर येत आहे की, तो आज सकाळी जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेला होता, तिथे वर्कआऊट दरम्यानच त्याला हृदयविकाराचा झटका आला.



त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांची तारांबळ उडाली. रिपोर्ट्सनुसार, त्याचे भाऊ शिवराजकुमार आणि यशही तिथे जिम करत होते. अभिनेता पुनीतची बातमी समजताच रुग्णालयाबाहेर त्याचे शेकडो चाहते जमा झाले. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त वाढवावा लागला होता. राज्यभरातून त्यांचे चाहते रुग्णालयाबाहेर आणि घराबाहेर पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर बंगळुरू शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले होते.



विक्रम हॉस्पिटलचे डॉ. रंगनाथ नायक यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी पुनीत यांची तब्येत खुप खराब झाली होती. पुनीत राजकुमार 46 वर्षांचे होते, पुनीत हे अभिनेता राजकुमार यांचे सुपुत्र आहेत. पुनीतने 'yuvarathnaa' या चित्रपटामध्ये आपली शेवटची भूमिका साकारली होती.सुपरस्टार पुनीत यांनी शेवटचे ट्विट सकाळी 7.30 वाजता केले. बजरंगी 02 चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पुनीतने 1 डिसेंबर 1991 रोजी चिक्कमगळुरू येथे अश्विनी रेवंतशी लग्न केले. एका कॉमन फ्रेंडद्वारे अभिनेता पहिल्यांदा आपल्या पत्नीला भेटला. पुनीत आणि अश्विनीला धृती आणि वंदिता या दोन मुली आहेत. पुनीत हे कर्नाटक मिल्क फेडरेशन प्रॉडक्ट्स, मलबार गोल्ड, मणिपुरम, एफ-स्क्वेअर, डिक्सी स्कॉट, इंडियन प्रीमियर क्रिकेट टीम रॉयल चॅलेंजर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. पुनीतकडे प्रीमियर फुटबॉल बॅगलोर 5 ची टीम देखील होती.





  सुपरस्टार पुनीत आणि अश्विनीची लव्हस्टोरीविषयी माहिती 

एक मुलाखतीमध्ये त्याच्या लव्हस्टोरीविषयी सांगितलं होते. प्रेम आणि लग्नापर्यंतचा त्याच्या या प्रवासाबद्दल त्याने वक्तव्य केलं होतं. पुनित आणि अश्विनीची ओळख त्यांच्या एका कॉमन फ्रेण्डमधून झाली होती. 1966 मध्ये दोघंही पहिल्यांदा एक इव्हेंटमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यांची मैत्री वाढत गेली. 8 महिन्यांच्या मैत्रीनंतर पुनितने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पुनितने अश्विनीला आपल्या मनातली गोष्ट सांगितली.


अश्विनीच्या मनातही पुनितविषयी विशेष प्रेम होतं. तिही त्याच्या नकळत प्रेमात पडली होती. पुनितने प्रपोज करताच अश्विनीने देखील आपला होकार कळवला. पुनितच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला पसंती दिली. मात्र अश्विनीच्या घरी थोडी समस्या होती. अश्विनीच्या घरचे दोघांच्या लग्नासाठी तयार व्हायला 6 महिने गेले.

अश्विन आणि पुनितने 6 महिने घरच्यांनाही मनवण्याचा प्रयत्न केला. अखेर 6 महिन्यांनंतर दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. परफेक्ट जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जायचं. आता मात्र ही जोडी तुटली आहे. पुनितच्या अचानक जाण्याने अश्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



स्टार्सबद्दल जे फिटनेसफ्रिक असूनही, हृदयविकाराच्या झटक्याने झालेय निधन


अबीर गोस्वानी

अबीर गोस्वानीला तुम्ही 'प्यार का दर्द है मीठा-मीठा', 'कुसुम' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलं असेल. अबीर गोस्वानी यांनी मे 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला. त्यांचे वय अवघे 37 वर्षे होते. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते ट्रेडमिलवर धावत होते.


सिद्धार्थ शुक्ला

2 ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिद्धार्थ त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सावध असायचा आणि त्याने एकही दिवस जिममध्ये जाणे सोडले नाही. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.


राज कौशल

अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज कौशल यांचे या वर्षी 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना रात्री अचानक छातीत दुखू लागलं आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते 50 वर्षांचे होते.


इंदर कुमार

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते इंदर कुमार यांनी वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 28 जुलै 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. खरं तर, 2011 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते हेलिकॉप्टरमधून थेट जमिनीवर पडले आणि इथूनच त्यांच्या आयुष्यात संकटांना सुरुवात झाली होती.


विनोद मेहरा

विनोद मेहरा यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. विनोद मेहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तेव्हा ते केवळ 45 वर्षांचे होते. विनोद मेहरा यांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 100 चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याच्या यशस्वी चित्रपटांमध्ये लाल पत्थर, अमर प्रेम, हिफाजत सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.





Post a Comment

0 Comments