Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एचएआरसी संस्थेच्या कामाने वंचितांचे आयुष्य उजळुन निघेल - कुलगुरु डॉ. अशोक ढवण 





400 वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा दिवाळी दान महोत्सव 

परभणी ➡️ समाजातील वंचित घटकांच्यासाठी काम करण, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा प्रकाशित करण हे परमेश्वराचे काम आहे. असे मत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले. एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित बालकांची दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थेतर्फे आज आयोजित दिवाळी दान महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. 



यावेळी प्राध्यापक बाळु बुधवंत, श्री. उल्हास खंबायतकर, एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक आणि 400 अनाथ, वंचित आणि एच. आय. व्ही ग्रस्त बालके उपस्थित होते. मागील 12 वर्षा पासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित घटकासाठी एचएआरसी संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून या वंचित मुलांना मदत केली जाते. यंदाही कोरोना मुळे लॉकडाऊन असला तरी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 



यावेळी एचएआरसी चे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले की, या घटकांसाठी काम करण हा आमच्या आनंदाचा भाग आहे. आम्हाला आनंद मिळतो म्हणुन आम्ही अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसु फुलविणे हा आमच्या कर्तव्याचा भाग असुन ते आम्ही आयुष्यभर करीत राहु. 

 


याप्रसंगी 05 प्रकारचे फराळ, डेटॉल साबण, हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, मुलींची सौंदर्य प्रसाधने, सॅनिटरी पॅड, ब्लॅंकेट, टॉवेल, एअर बॅग, शेंगदाणे चिक्की, मावा चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पॉवडर, पेन, पेन्सिल, शॅम्पु, शेंगदाणे लाडू बरणी, नवीन ड्रेस व साडी आदी साहित्य चा समावेश असल्याचे किट या मुलांना पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. 


या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी डॉ आशा चांडक, प्रा शिवा आयथॉल सर, विशाखा हेलसकर, ममता जाधव, राजेश्वर वासलवार, पुरुषोत्तम काळदाते, लक्ष्मीकांत भक्कड, सौ शितल चंद्रकांत राजुरे, गोपाल मुरक्या, अर्जुन पवार, प्रा पद्मा भालेराव, डॉ महेश अवचट, श्री. पाटणकर, गुणवंत अहीरे, बुध्दभुषण गाडे, ज्ञानेश्वर इक्कर, भक्ती तायडे, अंजली जोशी आदींची मदत झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विनोद शेडंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. महेश अवचट यांनी मानले.






Post a Comment

0 Comments