Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत एटीएममधून पैसे लुटणारे टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात 





परभणी ➡️ विविध बँकांच्या एटीएम मशीनमधून एटीएम कार्डद्वारे तसेच विशिष्ट प्रकारच्या चाबीचा उपयोग करुन एटीएम मधून पैैैसेची चोरी करणाऱ्या 02 आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने ताब्यात घेेेतले. या आरोपीकडून 60 एटीएमकार्ड, 49 हजार रुपये रोख व दोन मोबाईल जप्त केले आहेत. 



येथील बसस्थानकासमोर साई लॉजवर दोन व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्या व्यक्तींकडील बॅगांमध्ये काहीतरी संशयित साहित्य असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकास लागली. त्याआधारे एका पथकाने त्या लॉजवर जावून दोघा व्यक्तींची झडती घेतली. त्यात त्यांच्याकडे विविध बँकांचे 60 एटीएमकार्ड आढळून आले. 


या पथकाने विचारपूस केल्यानंतर हरियाणातील मेवाता जिल्ह्यातील एजाज खान नवाब खान व उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील मुस्तखीम खान याया खान हे दोघे तरुण शहरातील विविध एटीएम मशीनमधून या एटीएमकार्डद्वारे पैसे काढत असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी हे दोघे विशिष्ट प्रकारच्या चाबीचा उपयोग करीत, त्या चाबीने एटीएम मशीन अर्धवट उघडत, मशीनमधून अर्धवट पैसे बाहेर आल्यावर लगेच एटीएम मशीनचे बटन बंद करु पैसे काढून घेत.



त्यामुळे पॉवर कट होत व एटीएमचा एरर कोड तयार होत. त्यानंतर हे आरोपी एटीएमच्या टोलफ्री नंबरवर संपर्क साधून आपल्या अकाऊंटमधून पैसे कट झाले आहेत, परंतु आम्हास ते पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार करत. पॉवर कट केल्यामुळे एटीएम एरर कोड तयार होतो. त्यामुळे बँकेस सदरची फसवणूक लक्षात येत नाही. म्हणून बँक आरोपीच्या अकाऊंटमध्ये पैसे रिफंड करत. हे आरोपी त्यांच्या मूळ गाववाल्या लोकांचे एटीएम कार्ड कमीशनवर घेत असल्याचे निष्पन्न झाले असून हे दोघे आरोपी फसवणूक करण्यासाठी वापरत असणारी चाबी, रोख 49 हजार, दोन मोबाईल व 60 एटीएमकार्ड असा मुद्देमाल पथकाने जप्त केल्यानंतर एटीएम चॅनल मॅनेजर अंकुश भगवानराव घुलेकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


पोलिसांनी त्या आधारे आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी बर्‍याच ठिकाणी असे प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, पोलिस उपनिरीक्षक संतोष शिरसेवाड, साईनाथ पुयड, पोलिस अंमलदार हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, दिलावर पठाण, शेख अझहर, किशोर चव्हाण, हरि खूपसे, सय्यद मोबीन, गौस पठाण, संतोष सानप, शेख रफिक, पिराजी निळे, संजय घुगे, चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.




Post a Comment

0 Comments