Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अतिवृष्टी पावसामुळे पिकांचे नुकसानांचे त्वरित पंचणामे करून भरपाई देण्याची मागणी




 


जिंतुर ➡️ मौजे. डोंगरतळा, करंजी, व जिंतुर तालुक्यातील सर्वच मंडळ मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार  रुपये व शेतकरी व भुमीहीन लोकांना 03 महिण्याचे राशन गहु, तांदूळ, गोडतेल, साखर, दाळ, मसाला पावडर, मीठ आदी मदत करण्याची मागणी आज रिपब्लिकन सेना शाखा जिंतुरच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. 


या निवेदनात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे डोंगरतळा येथील तलाव पुर्ण भरल्यामुळे गावात पाणीच पाणी व जिंतुर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील पीकांचे भरपूर प्रमाणात नुसकान झाले आहे सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने जिंतुर तालुक्यातील सर्वच शेतकर्याच्या पिकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे पिकाचे नुकसान भरपुर झाले आहे.


तसेच डोंगरतळा येथील तलाव पुर्ण भरल्यामुळे 20 ते 30 घरात पाणी असल्यामुळे घरातील अन्य धान्याचे भरपुर नुसकान झाले आहे. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की आपण तलाठी, मंडळ अधिकारी यांना आदेशीत करुन तात्काळ पंचनामा करुन मौजे. डोंगरतळा व तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मद्दत म्हणून   हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे शेतकरी व भुमीहीन लोकांना तीन महिण्याचे राशनची फ्री मदत करावी ही मागणी केली गेली आहे.


या निवेदनावर तालुकाध्यक्ष शरद चव्हाण, संजय आडे, समाधान भदरगे, रामेश्वर  सुर्यवंशी, किशन घनसावंत, राहुल शिंदे, सचिन खिल्लारे,  राहुल साबळे,  रवि पाईकराव, प्रविण पाईकराव, बाबासाहेब  चव्हाण, सतिश निकाळजे आदीचे स्वाक्षरी आहे.





Post a Comment

0 Comments