Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

येलदरी धरण परिसरात मनाई आदेश लागु




 



परभणी ➡️ जिल्ह्यातील  येलदरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सद्यस्थितीत येलदरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या ठिकाणी लहान मुले छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करीत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



त्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण व धरणा समोरील नदी पात्राच्या 500 मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश  जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत.



येलदरी धरण व धरणा समोरील नदीपात्राच्या 500 मिटर परिसरात दि.27 सप्टेंबर 2021 रोजीच्या सायंकाळी 7 वाजेपासून ते दि.6 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात लोकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 



तसेच येथे छायाचित्र अथवा सेल्फी काढणे इत्यादी बाबीस मनाई करण्यात आली आहे. हे आदेश शासकीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागु राहणार नाही. हा आदेश बहुसंख्य व्यक्तींना लागु असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानूसार एकतर्फी काढण्यात आल आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments