Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात, 04 जणांनाचा मृत्यू




 

नागपूर ➡️ नांदेडवरून नागपूरकडे येताना उमरखेड समोरील पुलावरून वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडवरून बसलेल्या आठ प्रवाशांची नोंद एसटी महामंडळाच्या जीपीएस प्रणाली वरून झाली आहे. या बसमध्ये उमरखेड वरून पुन्हा किती प्रवासी बसले याची मात्र नोंद नाही. यामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती नाही. विशेष  म्हणजे एसटी चालक सतीश सूरेवार यांना एसटी महामंडळामध्ये 24 वर्षांच्या सेवेचा अनुभव आहे. त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. या अपघातात चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि कंडक्टर भिमराव लक्ष्मण नागरीकर (56)  यांच्या सोबत अन्य दोन प्रवासी असे 04 जण मृत पावले आहे.








नागपूरचे विभाग नियंत्रक नरेंद्र बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस घाटरोड डेपोची असून वाहन चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि कंडक्टर भिमराव लक्ष्मण नागरीकर (56) हे सेवेत होते. काल रात्री 10 वाजता प्रवासी घेऊन हे दोघेही नांदेडला निघाले होते. यानंतर, मंगळवारी सकाळी 05:18 वाजता ही बस नांदेडवरून निघाली. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणाली नुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते. त्यातील 4 हदगाव व 4 प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. उमरखेडवरून ही बस 7.30 वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेड पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने किती प्रवाशांचे बुकिंग झाले हे मात्र कळू शकलेले नाही. मरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच -14 - बीटी - 5018) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.


 🌐  एसटी चालकाला 24 वर्षाच्या सेवेचा अनुभव -  

एसटी चालक सतीश सूरेवार यांना एसटी महामंडळामध्ये 24 वर्षांच्या सेवेचा अनुभव आहे. 1997 मध्ये ते महामंडळात रुजू झाले होते. त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. मागील 15 वर्षापासून नागपूर- नांदेड या मार्गावरील सेवेचा त्यांना अनुभव होता. काल रात्री याच मार्गावरून बस नेताना त्यांना नाल्याला फारसा पूर दिसला नसावा. यामुळे परत येताना ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांनी ही बस पुलावरून टाकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



 🌐 केबिनमध्ये 04 जण मृतावस्थेत -  

एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एसटी बस नाल्यात वाहून गेल्यानंतर एसटीतील दोन प्रवासी झाडावर चढलेले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस नागपूर डेपोची होती नांदेड वरून नागपूरला निघाली होती. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केले. तीन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर केबिनमध्ये पुन्हा 3 जण मृतावस्थेत दिसत असल्याची माहिती आहे. बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 

बसमध्ये चालक, वाहकासह चार प्रवासी होते. खिडकीतून बाहेर पडलेले सुब्रमण्यम सूर्यनारायण नोल्ला (48, दिग्रस), शरद नामदेव फुलमाळी (27, पुसद) हे बचावले आहेत. मृतांमध्ये चालक सुरेश सुरेवार (53), वाहक भीमराव नागरीकर, इंदल मेहत्रे (28, पुसद), शे. सलीम उर्फ बाबू शेख इब्राहीम (40, पुसद) यांचा समावेश आहे. सायंकाळी क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. 






Post a Comment

0 Comments