Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोबो टूलच्या मदतीने होतेय ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाईन





परभणी
➡️ येणाऱ्या काळात खेडयापाड्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्हावे, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन करावे आणि शाश्वत स्वच्छता टिकून राहावी यासाठी कोबो टूलच्या मदतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दि. 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2021 या कालावधीत गाव विकास कृती आराखडा निर्मितीसाठी राज्यभर विशेष अभियानाची अंमलबजावणी करणे सुरू आहे.

कोबो टूलच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपली माहिती भरावी जेणेकरून गावागावात सांडपाणी व घनकचऱ्याचे नियोजन होऊन नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.


शिवानंद टाकसाळे

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, परभणी.

या अनुषंगाने परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने दि 28 आणि 29 जुलै 2021 रोजी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक आशाताई, अंगणवाडीताई यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणाला स्वच्छ भारत मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांची उपस्थिती होती तर प्रशिक्षक म्हणून मनुष्यबळ विकास तज्ञ अनिल मुळे, मूल्यमापन व सनियंत्रण तज्ञ प्रमोद टेंकाळे क्षमता बांधणी तज्ञ वनमाला कोरडे यांनी काम पाहिले.

गाव कृती विकास आराखड्याच्या माध्यमातून शाळा, अंगणवाडीला असलेले नळ कनेक्शन, गावातील प्रमुख पिके, येणाऱ्या काळात गावाला लागणारे पाणी, गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या अशा विविध घटकांचे नियोजन करण्यात येणार आहे.






Post a Comment

0 Comments