Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी दिपकजी मुगळीकर यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान





परभणी
➡️ कोरोना संक्रमनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये परभणी जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा संयम व कृतिशीलपणे हाताळत उत्कृष्ट प्रशासकीय नियोजन करीत वेळप्रसंगी कठोर भूमिका घेत दिपकजी मुगळीकर जिल्हाधिकारी परभणी यांनी कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष स्वतःला झोकुन देत वेळ, काळ याची पर्वा न करता सामान्य नागरीकांना न्याय देण्याचे व कोरोना पासून संरक्षित करण्याचे काम केले. 


तसेच त्यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये सामान्य नागरीकांसाठी जिल्हाधिकारी म्हणून सदैव उपलब्ध राहात जनसामान्यांना न्याय देण्याचे उत्कृष्ट काम केले. या कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे परभणी जिल्ह्यातील नागरीकांच्या वतीने दिपकजी मुगळीकर जिल्हाधिकारी परभणी यांची कोरोना योध्दा म्हणुन सन्मानपत्र देऊन सन्मान केला व पक्षाच्या वतीने त्यांना निरोप समारंभ ही देण्यात आला.


मागील आठवडयात जाहिर झालेल्या कोवीड काळामध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्याच्या कार्यक्रमांतर्गत पहिल्या व दुसऱ्या कोरोना संक्रमण लाटेमध्ये परभणी जिल्हयातील सामान्य नागरीकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे व धान्य वाटप करणे अशा विविध सामाजिक कार्याद्वारे सामान्य नागरीकांच्या प्रश्नांवर काम करनाऱ्या प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काल दि. 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 


यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मानवत तालुकाप्रमुख गोविंद मगर, पाथरी तालुकाप्रमुख युवराजजी राठोड, उपशहर प्रमुख पिंटू कदम, शंकर दामोधर, नकुल होगे, वैभव संघई, कैलाश राष्ट्रकुट यांना कोरोना काळामधील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानीत करण्यात आले. दोन्ही कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये पार पडले.




Post a Comment

0 Comments