Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

समोरा समोर जीप व मोटारसायकलची धडक, एक तरूण ठार




परभणी, [ 30 जून 21 ] ➡️ येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव शिवारातील ताडकळस- शिंगणापूर रस्त्यावर समोरासमोर जीप व  मोटरसायकलची धडक झाली. त्यात ताडकळस येथील 24 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवार  30 जुन रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील दत्ता माधवराव भारती (वय 24 वर्ष, रा. शंकर नगर ताडकळस )हा बुधवार  30 जुन रोजी सकाळी 11 वाजेच्या समारास  (एमएए-22- एबी -0158)  या मोटरसायकलवर ताडकळस-शिंगणापुर रस्त्यावरुन कामानिमित्त आमडापुरला जात होता. त्याचवेळी समोरुन  जीप  क्र (एमएच-22-एएम-4061) जीप येत होती. लोहगाव शिवारातील टावर जवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार दत्ता भारती  हा जागीच ठार झाला.  मयताच्या प्रेताचे ताडकळस  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पना आळणे, डॉ गणेश काचगुंडे यांनी शवविच्छेदन केले. उशिरा पर्यंत या प्रकरणी कोणतीही गुन्हाची नोंद झाली नव्हती. मयतच्या पश्चात आई, वडील ,भाऊ असा मोठा परिवार आहे. 



Post a Comment

0 Comments