Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नीट टॉपर मिताली राठीने डोनेट केले स्वाध्यायशक्ती अभ्यासिकेला 40 हजार रुपयांची पुस्तके





परभणी, [ 30 जून 21 ]
➡️ येथील गुरुगोविंदसिंग नगर येथे मोफत स्वाध्यायशक्ती अभ्यासिका ही होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे चालविले जाते. या संस्थामध्ये समाजातील अनाथ, दुर्धर आजारग्रस्त, वंचित मुलांना शिक्षण दिले जाते . या  स्वाध्यायशक्ती अभ्यासिका नीट टॉपर मिताली राठीने नुकतेच भेट देऊन 40 हजार रुपयांची पुस्तके डोनेट केली आहे.

येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे  समाजातील अनाथ, दुर्धर आजारग्रस्त, वंचित व एक पालक विद्यार्थीनीसाठी  पद्मावती टॉवर, गुरुगोविंदसिंग नगर, स्टेशन रोड, परभणी येथे मोफत अभ्यासिकाची चालते. या अभ्यासिकेचे उदघाटन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 12 जानेवारी रोजी केले होते. 

तेंव्हापासून समाजातील  एक पालक, अनाथ,  वंचित विद्यार्थिनींना अभ्यास करण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त अभ्यासिका, 11 वी ते पदवी पर्यंतची सर्व पुस्तकानी परिपूर्ण अशी लायब्ररी सुरू आहेत. अनेक वेळा   तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल इ लर्निंग ची व्यवस्था देखील केलेली आहे. सध्या अभ्यासिकेत 11, 12 वित शिकणाऱ्या व नीट ची तयारी करणाऱ्या मुली अभ्यासिकेत येत असतात. ही अभ्यासिका अशा वंचित मुलींसाठी पूर्णपणे मोफत आहे. 

नुकतीच मिताली डॉ विष्णू राठी हिने सहकुटुंब अभ्यासिकेला भेट दिली होती. ती 2020 मध्ये NEET परीक्षेत 690/720 मार्क्स घेऊन  256 रँक ने उत्तीर्ण होऊन सध्या AIIMS भोपाळ येथे MBBS शिकत आहे.  समाजातील वंचित अनाथ मुली देखील केवळ पैसे नाहीत आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे.  म्हणून यशापासून वंचित राहू नये म्हणून तिने आजवर अभ्यास केलेली सर्व 11th, 12th Science, NEET, Notes सर्व ऍडव्हान्स पुस्तके असे मिळून जवळपास 40 हजारांची पुस्तके एचएआरसी संचलित स्वाध्यायशक्ती अभ्यासिकेला डोनेट अर्थात दान केली. 

तिच्या या दातृत्वाबद्दल एचएआरसी टीम तर्फे तिचे आभार व कौतुक करण्यात आले. तिचे वडील डॉ विष्णू राठी हे आयुर्वेदिक डॉक्टर असून त्यांचा पाथरी येथे सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग  असतो. या उपक्रमाबद्दल एचएआरसी संस्थेचे डॉ पवन चांडक, डॉ शिवा आयथळ, डॉ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, प्रा अंजली जोशी, राजेश्वर वासलवार, अनुराधा अमीलकंठवार आदी टीमने आभार मानले.




Post a Comment

0 Comments