Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अतिरिक्त आयुक्त रजणित पाटील यांच्याहस्ते पाणी पुरवठा सुपरवायझर मो.अय्युब यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार





परभणी, [ 30 जून 21 ] ➡️ शहर महापालिकेच्यावतीने पाणी पुरवठा विभागातील सुपरवायझर मोहम्मद अय्युब युसूफ यांना बुधवार, 30 जून रोजी सेवानिवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणी पुरवठा इंजिनीअर तन्वीर बेग हे होते. 

यावेळी मो.अय्युब मो.युसूफ यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी पाणी पुरवठा विभाग प्रमुख तनवीर मिर्झा बेग,शहर अभियंता वसीम पठाण,मो.सोहेल, अंबोरे, मो.इस्माईल यांची उपस्थ्लिृती होती. यावेळी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, नगरपालिका अस्तित्वात असतांना 1990 साली कार्यरत झालो. आज 31 वर्ष सेवा केली असून पाणी पुरवठा विभागात काम केले. त्यावेळेस शहराची व्याप्ती होती. आज साडेतीन लोकसंख्या आहे. माझ्या अंतर्गत 135 लोक विविध विभागात काम करीत होते. 

🔸️🔸️🔸️ 


🔸️🔸️🔸️🔸️

शहरामध्ये आजस्थ्लिृतीला 22 वॉलमन असून 57 कर्मचारी पाणी पुरवठा विभागात काम करतात. माजी आयुक्त संबरकर, अभय महाजन, राहूल रेखावार, देविदास पवार यांच्या अधिपत्याखाली काम केले आहे. आपणास सर्व कामे इंजि.बाळासाहेब दुधाटे, सालम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहेत. यावेळी बोलतांना रणजित पाटील यांनी पाणी पुरवठा विभागात तत्पर सेवा देणारे मो.अय्युब आज सेवानिवृत्त होत असून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी इंजि.तन्वीर बेग, दापतीकर, विद्युत अभियंता सोहेल, प्रविण हट्टेकर, अनंत कौशीकवार, राहूल जुतळे, पवन देशमुख, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव, सुनिल सोळंके, भगवान काळे यांनी स.अय्युब यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे नियोजन बालाजी काळे, पुंडगे, कैलास काकडे आदींनी केले.

 




Post a Comment

0 Comments