Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जालन्यात कोविड रुग्णालयात बिलावरून तोडफोड, एकाला अटक




जालना ➡️ जालन्यात कोविड रुग्णालयात नातवाईकाच्या बिलावरून झालेल्या वादात रुग्णालयात दगडफेक करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. नूतन वसाहत परिसरात असलेल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आपल्या नातवाईकाच्या बिलावरून रितेश चौधरी याचा हॉस्पिटलमधील मेडिकल चालकासोबत सुरुवातीला वाद झाला होता. या वादाचे रुपांतर बाचाबाचीमध्ये झाले. त्यानंतर रितेश याने आपल्या अन्य 2 साथीदारांना घेऊन रुग्णालयात आला आणि रुग्णालयावर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली. यामध्ये मेडिकलची तोडफोड झाल्याने मोठा नुकसान झाले आहे. या घटनेत हॉस्पिटलमधील एक कर्मचारी जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रितेश चौधरी यास ताब्यात घेतले व त्याच्या अन्य दोन साथिदाराचा शोध सुुरु आहे. ही जालना शहरातील दुसरी घटना आहे. करोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांना अशी वागणूक देणे योग्य नसल्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांनी यावेळी सांगितले आहे.  

काही वेळा मध्येच पोलिसांनी रितेश चौधरी या इसमाला अटक केली आहे अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, घटनास्थळी पोलिस फौजफाट्या सह तत्काळ भेट दिली. सदरील हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल आहे येथे कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. या दगड फेकीमध्ये एका रुग्णाला दगड लागल्याने त्यास सामान्य वार्डा मध्ये हलविण्यात आले. रितेश चौधरी व दोन इसमावर सदर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.





Post a Comment

0 Comments