Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला जिल्ह्यातील गुरुवारचा कोरोना रिपोर्ट





परभणी जिल्ह्यात 7 हजार 846 रुग्णांवर उपचार सुरू, 1 हजार 265 रुग्णांची वाढ

परभणी ➡️ जिल्ह्यातील 1 हजार 265 रुग्णांचे अहवाल गुरुवार दि.29 एप्रिल 2021 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 हजार 435 एवढी झाली आहे. त्यापैकी  26 हजार 717 बरे झाले तर 872 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 7 हजार 846 जणांवर उपचार सुरु असून आज एकुण 489 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. तसेच आज 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण 8  हजार 150 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 7 हजार 846 तर व्हॅकन्ट बेड 304 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.




हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 197 रुग्ण, 221 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज,  तर सहा रुग्णांचा मृत्यू

हिंगोली ➡️ जिल्ह्यात 197 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 17 व्यक्ती, कळमनुरी परिसर 20 व्यक्ती,  सेनगाव परिसर 03 व्यक्ती व औंढा परिसर 16 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 136 व्यक्ती, वसमत परिसर 05 असे एकूण 197 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 221 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 440 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 39 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 479 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 12 हजार 470  रुग्ण झाले असून, त्यापैकी  10 हजार 947 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1296 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 227 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.




नांदेड जिल्ह्यात 816 व्यक्ती कोरोना बाधित24 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू

नांदेड ➡️ जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 320 अहवालापैकी 816 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 629 तर अँटिजेन तपासणीद्वारे 187 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 7 हजार 517  एवढी झाली असून यातील 66  हजार  307  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  11  हजार  416 रुग्ण उपचार घेत असून 187 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दोन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू 

दिनांक 28 ते 29 एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 531 एवढी झाली आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नायगाव येथील 45 वर्षाची महिला, बिलोली तालुक्यातील लागुल येथील 38 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील अनुक्रमे 71 व 33 वर्षाचा पुरुष, किनवट येथील 40 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 77 वर्षाचा पुरुष,इतवारा नांदेड येथील 50 वर्षाची महिला, विष्णुपुरी नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, तरोडा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 57 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव येथील 45 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील सारस येथील 37 वर्षाची महिला, नायगाव येथील 65 वर्षाची महिला, खाजी मोहल्ला अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील दगडगाव येथील 57 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील येवती येथील 58 वर्षाची महिला, होट्टल बेस देगलूर येथे 62 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यतील वाडोली येथील 55 वर्षाची महिला, किनवट तालुक्यातील पिंपरुोडी येथील 57 वर्षाची महिला, आधार रुग्णालय येथे नवी आबादी ढोकी नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष मेडीकेअर आणि क्रिटीकल केअर सेटर रुग्णालय लोहा येथे लोहा तालुक्यातील पोकरभोसी येथील 60 वर्षाची महिला दि. 29 एप्रिल 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोकर तालुक्यातील दिवशी येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुगणालय येथे सिध्दार्थ नगर देगलूर येथील 71 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के आहे.

आज 816 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह 

नांदेड मनपा 279, बिलोली 37, हिमायतनगर 10,उमरी 38, हिंगोली 10, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 22, देगलूर 27, कंधार 22, मुदखेड 22, परभणी 6, अमरावती 1, अर्धापूर 8, धर्माबाद 36, किनवट 6, मुखेड 18, यवतमाळ 4, भोकर 13, हदगाव 14, लोहा 25, नायगाव 26, लातूर 4  असे एकूण 629 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 41, बिलोली 2, माहूर 6, हिमायतनगर 4, कंधार 17, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 13, मुदखेड 9, मुखेड 5, हिंगोली 7, लातूर 1, अर्धापूर 3, धर्माबाद 27, किनवट 13, नायगाव 9, परभणी 3, सोलापूर 1, भोकर 3, हदगाव 5, लोहा4, उमरी 3, बोधन 2, पुणे 1  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 187 बाधित आढळले.

1 हजार 293 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

आज जिल्ह्यातील 1 हजार 293 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 20, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 837, धमार्बाद तालुक्यातंर्गत 11, देगलूर कोविड रुग्णालय 4, अर्धापूर तालुक्यातंर्गत 19, उमरी तालुक्यातंर्गत 54, मालेगाव टीसूयु कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 28, मुखेड कोविड रुग्णालय 25, मुदखेड कोविड रुग्णालय 3, , किनवट कोविड रुग्णालय 46, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 11, नायगाव तालुक्यातर्गत 3, खाजगी रुग्णालय 118, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 13, हदगाव कोविड रुग्णालय 10, कंधार तालुक्यातंर्गत 11, माहूर तालुक्यातंर्गत 10, लोहा तालुक्यातंर्गत 61, मांडवी कोविड केअर सेंटर 8  बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

11 हजार 416 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु 

आज 11 हजार 416 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 185जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 91जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 164शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 92, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 124, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 116, देगलूर कोविड रुग्णालय 46, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 44, बिलोली कोविड केअर सेंटर 75, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 32उमरी कोविड केअर सेंटर 32माहूर कोविड केअर सेंटर 22भोकर कोविड केअर सेंटर 5हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 58, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 60, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 75 , मुदखेड कोविड केअर सेंटर 15, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 10, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, मांडवी कोविड केअर सेंटर 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 41एनआरआय कोविड केअर सेंटर 90पंजाब भवन कोविड केअर सेंटर 33 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 4 हजार 911, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 48 , खाजगी रुग्णालय 2 हजार 3, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 11 हजार 416 उपचार घेत आहेत.


 

2553 अहवाल प्राप्त, 504 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज, 10 मृत्यू


अकोला ➡️ आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2553 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2049  अहवाल निगेटीव्ह तर 504 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 438 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 10 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 39623(30759+8687+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 504 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 168 असे एकूण पॉझिटीव्ह 672 आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 204460 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 201589 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2484 नमुने होते. आजपर्यंत एकूण 204308 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 173549 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 



504 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 504 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 208 महिला व 296 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-78, अकोट-67, बाळापूर-25, तेल्हारा-37, बार्शी टाकळी-20 पातूर-33, अकोला-244. (अकोला ग्रामीण-28, अकोला मनपा क्षेत्र-216) दरम्यान काल (दि. 28) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 168 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


10 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात अक्कलकोट भोईपूरा येथील 76 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य कैलास नगर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 24 रोजी दाखल करण्यात आले होते, जनूना ता. बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी ताथोड नगर येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. मोठी उमरी  येथील 42 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते,अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच पारस ता. बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 22 रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा येथील 81 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 27 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात मिर्झापूर अन्वी येथील 62 वर्षीय पुरुष असून त्याना दि. 23 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य  येथील 72 वर्षीय महिला असून त्याना दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.


 438 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 34, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, पाटील हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर येथील 54 तर होम आयसोलेशन मधील 315 असे एकूण 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


5244 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 39623(30759+8687+177) आहे. त्यात 678 मृत झाले आहेत. तर 33701 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5244 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.







Post a Comment

0 Comments