Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शिक्षकांवर हल्ला करणाऱ्या नायब तहसीलदारावर कार्यवाहीसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघ आक्रमक




 

 
सेलू ➡️ सेलू कोरोना महामारी संकट काळात ढालेगाव ता. पाथरी जि. परभणी येथे चेकपोस्टवर कर्तव्यावर शिक्षकांची ड्युटी सुरु असतांना पाथरी येथील शिक्षकावर नायब तहसीलदार व त्यांच्या सोबताच्यांनी कर्तवव्यावर असणाऱ्या शिक्षकांवार हल्ला करून शिवीगाळ केल्याची घटना बुधवार दि. 28 एप्रिल रोजी ढालेगाव चेकपोस्टवेअर घडली.




या प्रकरणी सबंधित नायब तहसीलदार व त्यांच्या साथीदारावर कार्यवाहीसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघ आक्रमक झाला असून त्यांनी या प्रकरणी उपविभागीय अधिकारी सेलू यांना आज 29  एप्रिल रोजी निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली. कोरोना महामारी संकट काळात ढालेगाव ता. पाथरी जि. परभणी येथे चेकपोस्टवर कर्तव्यावर शिक्षकांची ड्युटी सुरु असताना स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता शिक्षक कर्तव्य बजावत आहेत. रात्री शांताबाई नखाते प्राथमिक शाळेचे  शिक्षक  बळीराम चव्हाण व अरविंद गजमल यांची ड्युटी सुरु असताना, रात्री 12 वाजता नायब तहसीलदार कट्टे व इतर सहकारी खाजगी वाहनचालक सुनील पाटील, आसाराम शिंदे यांनी कर्तव्यावर असणाऱ्या चव्हाण व गजमल यांच्यावर हल्ला केला.

या प्रकरणी राष्ट्रवादी शिक्षक संघांचे जिल्हा उपाधाक्ष धनंजय भागवत यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याशी फोनवर संवाद साधून पाथरी येथे घडलेल्या प्रकरणासंबधी माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे संबधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याची आ.विक्रम काळे यांनी सांगितले.


अश्या बेजबाबदार कर्तृत्व करणाऱ्यावर  कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शिक्षक संघ परभणी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सेलू यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी धंनजय भागवत रा. शि. संघ,उपाध्यक्ष परभणी,भगवान देवकते रा. शि. संघ,तालूका अध्यक्ष, सेलू,रामकिशन कटारे रा. शि. संघ,सरचिटणीस सेलू तालूका, क्रीडा शिक्षक संघटनाचे अध्यक्ष गणेश माळवे यांची उपस्थिती होती. शिक्षकावर हल्ला करणाऱ्या नायब तहसीलदारव त्यांचा सहकार्यावर  कार्यवाही नाही झाल्यास  राष्ट्रवादी शिक्षक संघ परभणीकडून सविनय मार्गाने आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी शिक्षक संघांचे जिल्हा उपाधाक्ष धनंजय भागवत यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याशी फोनवर संवाद साधून पाथरी येथे घडलेल्या प्रकरणासंबधी माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे संबधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याची आ.विक्रम काळे यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments