Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी वाढविला कोरोना प्रतिबंधित उपाय अंतर्गत निर्बंधाचा कालावधी







🔺️ परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद व महाविद्यालये 31 मार्च ते 04 एप्रिलपर्यंत बंद

🔺️ विदर्भातील वाहतुकीस, रास्तारोकोसह मोर्चे, निदर्शनांवर 15 एप्रिलपर्यंत प्रतिबंध

🔺️ धार्मीकस्थळे 15 एप्रिलपर्यंत बंद

🔺️  परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यान बंद

🔺️ सर्व राजकीय, सामाजिक व धार्मीक कार्यक्रम इत्यादीवर निबंध


परभणी ➡️ जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे 30 मार्च रोजी प्रतिबंधात्मक उपाय अंतर्गत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी (दि. 30) नवे निर्बंधांचेआदेश काढले आहेे. जिल्हातील सर्व शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद व महाविद्यालये 31 मार्च ते 04 एप्रिलपर्यंत बंद,  विदर्भातील वाहतुकीस,रास्तारोकोसह मोर्चे, निदर्शनांवर, सर्व राजकीय, सामाजिक व धार्मीक कार्यक्रम 15 एप्रिलपर्यंत प्रतिबंध आणि धार्मीकस्थळे 15 एप्रिलपर्यंत बंद राहिल. 


💥परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद व महाविद्यालये 31 मार्च ते 04 एप्रिलपर्यंत बंद


इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी (दि. 30) दिले. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालय तसेच शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) 31 मार्चपासून ते 04 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. प्राध्यापकांनी महाविद्यालयात नियमित अध्यापनाचे काम ऑनलाईन पध्दतीने करावे, असेही म्हटले आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 05 ते इयत्ता 09 व इयत्ता 11 वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश यापुर्वी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. 


कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता 15 एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी नव्याने देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 05 ते इयत्ता 09 व 11 वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 15 एप्रिलपर्यंत बंद करण्यात येत आहेत. इयत्ता 10 व 12 वीचे वर्ग नियमित सुरू राहतील. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन तसेच अभ्यासगटाच्या माध्यमातून अध्यापनाचे कामकाज व आवश्यकती कामे करावीत. शिक्षण प्रक्रिया बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.इयत्ता दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कोविड-19 बाबत सर्व शासन परिपत्रकानुसार प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात नमूद केले आहे.


💥 धार्मीकस्थळे आता 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार


कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धार्मीकस्थळे 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी (दि. 30) दिले.


जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता काही कालावधीकरिता बंद करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यात वाढ करत धार्मिक स्थळे आता 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवावित, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी सायंकाळी नव्याने जारी केले. धार्मीक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींना परवानगी राहील, असेही आदेशात म्हटले आहे.


💥 विदर्भातील वाहतुकीस 15 एप्रिलपर्यंत प्रतिबंध


जिल्ह्यात नागरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणारे व विदर्भात जाणार्‍या व्यक्ती व वाहनास अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास 15 एप्रिलपर्यंत मनाई करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी (दि. 30) नव्याने जारी केले आहेत. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातून परभणीत जिल्ह्यात येणारे व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणार्या कोणाही व्यक्तीस व वाहनास अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.


💥 रास्तारोकोसह मोर्चे, निदर्शनांवर 15 एप्रिलपर्यंत बंदी


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष, संघटनांच्या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषणे व अन्य सर्व प्रकारच्या आंदोलनांवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 15 एप्रिलपर्यंत निर्बंध जारी केल्याचे आदेश दिले. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणार वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना यांच्याकडून आयोजित करण्यात येणार्या मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, उपोषण व सर्व प्रकारच्या आंदोलनांवर 15 एप्रिलपर्यंत निर्बंध लावण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.


💥 जिल्ह्यातील आठवडे बाजार 15 एप्रिलपर्यंत बंद


कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडे बाजार दि. 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी (दि.30) जारी केले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगर पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी, नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर राहील, असे आदेशात म्हटले आहे.


💥जिल्हयात सर्व राजकीय, सामाजिक व धार्मीक कार्यक्रम इत्यादीवर निबंध


जिल्ह्यात करोना बाधीत रुग्ण संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे.जिल्ह्यात करोना संसर्ग वाढणार नाही या बाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामूळे सद्यस्थित जिल्हयात करोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व राजकीय, सामाजिक व धार्मीक कार्यक्रमा निमीत्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी राजकीय, सामाजिक व धार्मीक इत्यादी कार्यक्रमावर दि.31.03.2021 रोजी पर्यंत घालण्यात आलेले निबंध लावण्यात आले होते. तो कालावधी वाढवून ते निबंध दि. 15.04.2021 रोजी पर्यंत कायम ठेवण्यात येत आहेत.

💥 परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यान बंद


जिल्ह्यात करोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी व उद्यानात वावरतांना नागरीक सुरक्षीत सामाजिक अंतरचे पालन न करणे, सॅनटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता संचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी शहरातील राजगोपाल्लाचारी उद्यान दि.31.03.2021 रोजी पर्यंत नागरीकांसाठी बंद करण्यात आले होते. तो  कालवधीत वाढ करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी दी.म.मुगळीकर यांनी शहरातील राजगोपालचारी उद्यान दि.15.04.2021 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देत आहे. सदरील आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मनपा आयुक्त महानगरपालीकाची राहील. सदरील ओदशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्‍ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.



Post a Comment

0 Comments