Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नांदेड जिल्ह्यात आज 950 व्यक्ती कोरोना बाधितांची भर, 20 जणांचा मृत्यू





नांदेड ➡️ जिल्ह्यात मंगळवार, 30 मार्च 2021 रोजी 950 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 2 हजार 509 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 448 तर अँटिजेन तपासणीद्वारे 502 अहवाल बाधित आहेत. आजचे 950 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 41 हजार 956 एवढी झाली आहे. यातील 30 हजार 993 बाधितांना उपचारानंतर रुग्णालयातून आजवर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 73.87 टक्क्यावर आले आहे. 

20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

दिनांक 28 व 29 मार्च या दोन दिवसात 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे वानेगाव ता. नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, बाबा नगर नांदेड येथील 59 वर्षाचा पुरुष, खोब्रागडे नगर नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, दत्त नगर  नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथे स्वागत नगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, लसनवाडी ता. माहूर येथील 60 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे सिडको नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, वानेगाव ता. नांदेड येथील 55 वर्षीय महिला, सप्तगिरी कॉलनी नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, भाग्य नगर नांदेड 56 वर्षाचा पुरुष, गोवर्धन घाट नांदेड येथील 78 वर्षाचा पुरुष, विष्णूनगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, कैलास नगर नांदेड 58 वर्षाचा पुरुष, सराफा नांदेड येथील 38 वर्षाचा पुरुष, विष्णूनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, वाघी ता. नांदेड येथील 37 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालयात आंबेडकर नगर देगलूर येथील 38 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालयात नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 63 वर्षाची महिला , कलामंदिर नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष असे एकूण 20 रुग्ण उपचारादरम्यान दिनांक 28 ते 29 मार्च, 2021 या दोन दिवसात मृत पावले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 770 एवढी झाली आहे. आजच्या2 हजार 509 अहवालापैकी 1 हजार 509 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 41 हजार 956एवढी झाली असून यातील 30 हजार 993 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 958 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 165 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

781 कोरोनाबाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 531, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, नायगाव तालुक्यांतर्गत 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 43, लोहा कोविड रुग्णालय 8, मुखेड तालुक्यांतर्गत 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल, नांदेड 47, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 7, भोकर तालुक्यांतर्गत 5, माहूर तालुक्यांतर्गत 7, अर्धापूर तालुक्यांतर्गत 20, खाजगी रुग्णालय 70 असे एकूण 781 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.87 टक्के आहे.

950 व्यक्ती कोरोना बाधितांची भर

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 253, नायगाव तालुक्यात 10, अर्धापूर 8, नांदेड ग्रामीण 25, मुदखेड 13, लोहा 12, कंधार 8, मुखेड 32, धर्माबाद 2, परभणी 1, हिंगोली 4, हदगाव तालुक्यात 18, किनवट तालुक्यात 26, भोकर तालुक्यात 8, पंढरपूर 1, देगलूर तालुक्यात 14 असे एकूण 448 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 345, बिलोली तालुक्यात 38, मुखेड 11, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 14, किनवट 21, नायगाव 1, परभणी 3, अर्धापूर 5, धर्माबाद 1, लोहा 26, उमरी 4, भोकर 16, हदगाव 1, माहूर 3, यवतमाळ 1,  हिमायतनगर तालुक्यात 2 असे एकूण 502 बाधित आढळले.

 9 हजार 958 बाधितांवर औषधोपचार सुरु 

जिल्ह्यात 9 हजार 958 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 254, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 90, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 104, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 109, मुखेड कोविड रुग्णालय 252, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 36, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 64, बिलोली कोविड केअर  सेंटर 32, हदगांव कोविड केअर सेंटर 66, लोहा कोविड केअर व कोविड सेंटर 99, कंधार कोविड केअर सेंटर 33, महसूल कोविड केअर सेंटर 163, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर 56, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 23, बारड कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 21, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 26, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर4, हदगाव कोविड केअर सेंटर 55, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 944, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 731,  खाजगी रुग्णालय 597, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत.  मंगळवार 30 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे.

 





Post a Comment

0 Comments