Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, लवकरच होणार शस्त्रक्रीया





मुंबई
➡️ बॉलिवूडचे स्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरून याबाबत माहिती दिली आहे. मात्र त्यांना काय त्रास होतोय याबाबत अद्याप काहीही समजलेले नाही.

अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री एक ब्लॉग लिहला असून त्यात फक्त एका ओळीत त्यांनी शस्त्रक्रीयेबाबत सांगितले आहे. 'मेडिकल कंडिशन सर्जरी मी लिहू शकत नाही' असे अमिताभ यांनी या ब्लॉगमध्ये लिहले आहे. त्याचा हा ब्लॉग वाचल्यानंतर त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. अनेकांनी कसली शस्त्रक्रीया, काय झाले आहे असे प्रश्न विचारले आहेत. शनिवारी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करत त्यात कवितेच्य़ा दोन ओळी लिहल्या होत्या. 'कुछ ज़रूरत से ज़्यादा बढ़ गया है ; कुछ काटने पर सुधरने वाला है ; जीवन काल का कल है ये , कल ही पता चलेगा कैसे रहे वे' असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांचे हे ट्विट त्यांच्या शस्त्रक्रीयेसी जोडले जात आहे.

 




Post a Comment

0 Comments