Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय डाके पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पत्र





परभणी ➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल कि त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देण्याचे विसरत नाहीत. असेच एक पत्र शहरातील वैभवनगर येथील बालविद्या मंदिर मध्ये सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला 27 नोव्हेंबर आले आहे. 

खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवून पाठवले होते. या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले, ‘वास्तविक  चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते. या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भुत आहे. त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे,  ‘तुझ्या कलाकृतीबरोबरच, पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते. पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. 

त्यांनी पत्रात लिहिले आहे, ‘तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्दयांप्रति सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो.’  पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

तत्पूर्वी अजयने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितले होते कि त्याला चित्र काढायला खूप आवडते. अजयने लिहिले होते कि त्याचे चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचे अजयने पत्रात लिहिले होते.





Post a Comment

0 Comments