Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या






औरंगाबाद ➡️ एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील जुने कावसन येथ उघडकीस आली. राजू ऊर्फ संभाजी निवारे (40) आश्विनी राजू निवारे (35) व मुलगी सायली (10) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत सहा वर्षाचा मुलगा सोहम गंभीर जखमी असून त्याच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहे. संपूर्ण कुटुंबावर झालेल्या हा हल्ल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरून गेला असून पोलिसांनीही तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे फिरवली असून संशयितांची चौकशी सुरु आहे. 

विशेष तिघांची हत्या मारकऱ्यांनी गळा चिरुन हे हत्याकांड केले. यामुळे घरात रक्ताचा सडा दिसून आला. 6 वर्षीय सोहमच्या डोक्याला मार लागला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पैठण शहरापासून जवळच असलेल्या जुने कावसन येथे ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. पती, पत्नी व मुलगी यांची हत्या करण्यात आली. 06 वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही हल्ला चढवण्यात आला. तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मृत निवारे कुटुंबाचे घर हे गोदाकाठी आहे. घटनेनंतर औरंगाबादेतून दाखल झालेल्या श्वानपथकाने मारेकर्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून तपासालावेग दिला. मारेकऱ्याच्या शोधासाठी तातडीने पथके गठित करण्यात आले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. राजु निवारे हे एका फायनान्स कंपनीत कामाला होते. त्यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. मारेऱ्यांनी घरातील दागिन्यांना हात लावला नाही. त्यामुळे पोलिस सर्वच बाजूने तपास करत आहेत. हे हत्याकांड कोणत्या कारणामुळे घडले, याचा उलगडा पोलिस शोधत आहे.




Post a Comment

0 Comments