Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नरसापूर - नगरसोल रेल्वे मंगळवारपासून धावणार





परभणी ➡️ दक्षिण मध्य रेल्वे मंगळवारपासून (दि. एक डिसेंबर) नरसापूर - नगरसोल ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार असून या आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही, असेही रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने शनिवारी एका प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे.

नरसापूर - नगरसोल (क्र.02713) ही विशेष रेल्वे नरसापूर येथून सकाळी 11 वाजून पाच मिनिटांना निघणार आहे. पालवाकोल्लू येथे 11.13 ला येईल. सिकंदराबाद येथे रात्री 07 वाजून 50 मिनिटांना पोचेल, निजामाबाद येथे रात्री 10 वाजून 28 मिनिटांनी येईल, बासर येथे 11 वाजता, मुदखेड येथे मध्यरात्री 12 वाजून 33 मिनिटांनी तर नांदेड येथे रात्री 01 वाजता, पूर्णा येथे 01 वाजून 40 मिनिटांनी, परभणीत सव्वादोन वाजता पोचेल, जालना येथे 03 वाजून 33 मिनिटांनी, औरंगाबाद येथे चार वाजून 30 मिनिटांनी तर नगरसोल येथे 6 वाजून 55 मिनिटांना पोचणार आहे.

 नगरसोल - नरसापूर (क्र.0271) ही विशेष रेल्वे नगरसोल  येथून दुपारी बारा वाजून 50 मिनिटांनी निघेल. तेथून औरंगाबादेत 02 वाजून 20 मिनिटांनी, जालनात सव्वातीन वाजता, परभणीत सायंकाळी पाच वाजता पोचणार आहे. पूर्णा येथे 05 वाजून 35 मिनिटांनी, नांदेड येथे सहा वाजून 13 मिनिटांनी, मुदखेड येथे 06 वाजून 48 मिनिटांनी, बासर येथे सात वाजून 39 मिनिटांनी, निझामाबाद येथे रात्री आठ वाजून आठ मिनिटांना पोचेल, सिकंदराबाद येथे 11 वाजून 40 मिनिटांनी, वरंगल येथे 02 वाजून 02 मिनिटांना तर नरसापूर येथे सकाळी आठ वाजून 35 मिनिटांनी पोचणार आहे.




Post a Comment

0 Comments