Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करा- खा.चिखलीकर




नांदेड ➡️ जिल्हयातील वेगवेगळया भागात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामतील पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाही शेतक-यांना अतिवृष्टींचा मोठा तडाखा बसला आहे तेव्हा राज्य सरकारने संकटात सापडलेल्या बळीराजाला तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांचे मदत व अनुदान जाहीर करावे अशी मागणी जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

कोरोनाच्या दुस-यांदा संसर्गातून उपचार घेतल्यानंतर काही दिवसाच्या विश्रांतीनंतर हे शेतक-यांच्या जनसामान्यांच्या अडीचडचणी व संकटाला धावून गेले सोनखेड मंडळातील सोनखेड, पिंप्रणवाडी, शेलवाडी, पळशी, भेंडेगाव, शेवडी (बा.)या भागात त्यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली तेथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला.सोयाबीन, पाण्याखाली गेले काही भागात संपूर्ण ज्वारी आडवी झाली उसाचेही मोठे नुकसान झाले तर कापूस अतिवृष्टीमुळे झडून गेला असे विदारक आणी वेदनादायी शेतीचे चित्र शेतक-यांच्या डोळ्यात अश्रु आणनारे आहे.

या भागात खासदार प्रतापराव पाटील गेले तेथील शेतक-यांनी आपल्या व्यथा पोटतिडकीने मांडल्या आपलेही कोणी ऐकणार आहे. आणि ते शासना समोर प्रभावी पणे सरकार समोर मांडणारा लोकनेता आपल्यासाठी धावून आला ही भावना लोकांच्या बोलण्यातुन दिसुन आली. यावेळी उपविभागीय अधिकारी व्ही.एस.बोरगावकर, तहसिलदार विठ्ठल परळीकर,गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपल्लेवार या सह दक्षिणनांदेडचे भाजपा तालुका अध्यक्ष सुनिल मोरे, उपसभापती बळीराम पा.कदम, पं.स.उपसाभापती नरेंद्र गायकवाड, लक्ष्मणराव बोडके, खुशाल जाधव, नाना मोरे, डॉ.पंजाबराव देशमुख, गणेश मोरे, बळू पा.ढवळे, हरी पा.वानखेडे यांची उपस्थिती होती. या गावांच्या पिक पाहणी दौ-यांत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शेतक-यांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे.




Post a Comment

0 Comments