Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आमदार डॉ.राहुल पाटील यांनी थेट बांधावर जाऊन केली पिकांच्या नुकसानीची पाहणी







परभणी
➡️ परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटींल यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर थेट बांधावर जाऊन केली पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकर्‍यांसमोर कृषिमंत्र्यांना फोन करून मदतीची मागणी केली.

आ.डॉ.पाटींल यांनी सांगितले की, परभणी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहे. यंदा चांगली पिके बहरलेली असताना सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने व अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेतातील मुग, उडीद, सोयाबीन कापूस व ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून त्याला पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. आज तहसीलदार, बीडीओ, कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन मतदारसंघातील धार, समसापूर, मांगणगाव, मटकर्‍हाळा व इतर गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. 

सरसकट पंचनामे करण्यास अगोदर टाळाटाळ केली असल्याने थेट बांधावरून शेतकर्‍यांसमोर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना फोन केला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. तसेच हा पाऊस थांबणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजुनही पुढे हे नुकसान वाढणार असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आमच्या शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कृषिमंत्री यांना केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकार्‍यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना निश्चितच मदत करेल. त्यासाठी कायम पुढाकार घेईल, असा विश्वास यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना दिला.





Post a Comment

0 Comments