Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्कुटी व मोटारसायकलच्या अपघातात सहा जण जखमी





जिंतुर
➡️  चारठाणा येथून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या जिंतुर – जालना रस्त्त्यावरील सिंगटाळा पाटीवर स्कुटी व मोटारसायकलच्या अपघातात सहा जण जखमी झाले आहे. चार जणांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी (दि.31) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला.
    विना क्रंमाकाच्या स्कुटीवर तिघेजण जिंतूर येथून वाघी ( धानोरा ) या गावाकडे जात होते. तर होंडा कंपनीच्या (एम.ए.48 झेड.3694) या क्रमांकाच्या मोटारसायकलवर जिंतुर तालुक्यातील कोठा येथील तिघे जिंतुरकडे जात होते. दरम्यान सिंगटाळा पाटीवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन त्य‍ात अनिल शिंदे (वय 20), राजु निकाळजे (वय 35), उत्तम वाघ (वय 52, सर्व रा.कोठा ता.जिंतुर) मल्हारी वाघ (वय 55), सुशीलाबाई पवार (वय 35), रामदास पवार (वय 12 रा.धानोरा ता.जिंतुर) असे एकुण 06 जण सदर अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान जखमीना ग्रामस्थ व पोलीसांनी उपचारासाठी तात्काळ परिवहन मंडळाच्या बसमधुन जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु यातील चार जणांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments