Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीचा राष्ट्रीय टेबल टेनिसपटू वरद लोहटची पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्ड अँकडमिसाठी निवड




परभणी ➡️  परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचा राष्ट्रीय टे.टे खेळाडू व महाराष्ट्र राज्यात अव्वल नामाकंन खेळाडू चि.वरद नितीन लोहट यांची राज्यस्थान राज्य तील अजमेर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड अँकडमि  टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रात  राज्य निवड चाचणीतून निवड करण्यात आली आहे.                                 
    पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्रात  राष्ट्रीय स्तरावर निवड केलेल्या खेळाडूंना निवासी शिक्षणासह आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांच्या नियोजनाखाली प्रशिक्षण दिले जाते. तसेच  आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी खेळाडूना  संपूर्ण खर्च ही अकॅडमी वतीने दिला जातो. ही माहिती जिल्हा सचिव गणेश माळवे यांनी दिली. वरद लोहट ची कँडेट गटात पट्रोलियम स्पोर्टस प्रमोटेशन बोर्ड टेबल टेनिस अकँडमि अजमेर साठी झाली आहे.  शै.वर्षे 20-21 मध्ये प्रवेश मिळाला आहे. वरदने 2018 च्या वर्षीतराज्य नामाकंन टे.टे. स्पर्धेत दोन विजेते तर तीन उपविजेता ठरला ,तर 2019 मध्ये तीन राष्ट्रीय नामाकंन  स्पर्धेत सहभाग नोंदवला.वरद लोहट या खेळाडू स मार्गदर्शन टेबल टेनिस प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे लाभले, निवडी बदल  टेबल टेनिस राज्य अध्यक्ष राजीव बोडस,  सरचिटणीस  प्रकाश तुळपुळे, रामलू पारे, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष समशेर वरपुडकर, संतोष सावंत, डॉ. माधव शेजुळ , जिल्हाक्रीडाधिकारी नरेंद्र पवार, राज्य टे.टे.मार्गदर्शक अनिल बंदेल, जिल्हा सचिव गणेश माळवे, ज्ञानेश्वर पंडित,  जिजाऊ संस्थाध्यक्ष राम लोहट, पालक नितीन लोहट, टेबल टेनिस क्रीडा प्रेमीतून अभिनंदन होत आहे.




Post a Comment

0 Comments