Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गळफास घेऊन १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या




परभणी 
➡️  पुर्णा तालुक्यातील कानखेड शिवारात आज रविवार दि. ३० आॅगस्ट रोजी कमल अजमेरा यांच्या शेतातील झाडाला साडीच्या साहाय्याने एका 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 
    या संदर्भात पुर्णा पोलीसांना मयत तरुणाचा भाऊ शेख अकबर शेख निजामुद्दीन यांनी दिल्यामाहितीनुसार बीठ जमादार सय्यद मोईन व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर मृतदेह मयताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
      कानखेड शिवारात आत्महत्या केलेल्या सदरील तरूणाचे नाव शेख महेबूब शेख निजामुद्दीन असे असून तो मौ.कंठेश्वर ता.पुर्णा येथील रहिवासी होता. रागीष्ट स्वभावाचा असल्याने त्याने घरातील किरकोळ वादावरून आत्महत्या केल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते. मयताचा मोठा भाऊ शेख अकबर याने दिलेल्या माहिती वरून पुर्णा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास बिट जमादार सय्यद मोईन हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments